एकापेक्षा जास्त सदस्य Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर; प्राजक्ताच्या एव्हिक्शननंतर दुसऱ्याच दिवशी मोठा झटका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Elimination : प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिग बॉसने घरातील एकापेक्षा जास्त सदस्य घरातून बाहेर जाणार असल्याचा मोठा झटका दिला आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 मध्ये रविवारी 15 मार्च रोजी एव्हिक्शन झालं. घरातील आणखी एक सदस्य घरातून बाहेर पडला, ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील सदस्यांना धक्का बसला आहे. तोच त्यांना आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे.
advertisement
2/7
आता बिग बॉस मराठी 6 च्या घरातील एक नाही तर एकापेक्षा अधिक सदस्य घराबाहेर जाणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली आहे. बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात एकापेक्षा अधिक सदस्य एलिमिनेट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
3/7
सदस्यांना मगरीच्या तोंडी देऊन नॉमिनेशन केलं जात आहे. म्हणजे नॉमिनेशनसाठी मगरीच्या तोंडात सदस्यांचं फोटो टाकले जात आहे.
advertisement
4/7
जे सदस्य नॉमिनेट होतील त्यातील एकापेक्षा जास्त सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातील, असं बिग बॉस या प्रोमोत सांगत आहेत. तसंच कॅप्शनमध्ये तसं लिहिलं आहे.
advertisement
5/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून आतापर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओमकार राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सचिन कुमावत, रुचिता जामदार आणि प्राजक्ता शुक्रे असे 9 सदस्य घरातून बाहेर गेले आहेत.
advertisement
6/7
आता घरात अनुश्री माने, दिपाली सय्यद, रेवा कौरासे, सागर कारांडे, विशाल कोटियन, राकेश बापट, प्रभू शेळके, तन्वी कोलते, संकेत पाठक, संस्कृती साळुंखे, राखी सावंत असे एकूण 11 सदस्य आहेत.
advertisement
7/7
राखी, संकेत, संस्कृती आणि रेवा हे वाइल्ड कार्ड सदस्य आहेत. त्यामुळे आता एकूण 11 सदस्यांपैकी कोणते सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकापेक्षा जास्त सदस्य Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर; प्राजक्ताच्या एव्हिक्शननंतर दुसऱ्याच दिवशी मोठा झटका