TRENDING:

Weather Alert : राज्यात रविवारचा दिवस पावसाचा, 4 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाहुयात 3 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
1/7
राज्यात रविवारचा दिवस पावसाचा, 4 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट
3 ऑगस्ट रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांत या भागांत पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे.
advertisement
2/7
तर विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. पाहुयात 3 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
मुंबईमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
4/7
पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव याठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर यासर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. तर विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : राज्यात रविवारचा दिवस पावसाचा, 4 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल