TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रावर संकटाचे ढग गडद, वादळी पाऊस होणार; 33 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजीही राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर संकटाचे ढग गडद, वादळी पाऊस होणार; 33 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजीही राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पाहुयात 26 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण आणि मुंबई परिसरातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील देखील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
7/7
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी, तर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर संकटाचे ढग गडद, वादळी पाऊस होणार; 33 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल