TRENDING:

Weather Alert: राज्यातील 4 जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात 1 ऑगस्ट रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
1/7
राज्यातील 4 जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून पावसाने काढता पाय घेतला आहे. या सर्व ठिकाणी हलक्या श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे; पण कुठेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. 1 ऑगस्टला विदर्भात मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील तीन-चार दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 1 ऑगस्ट रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईसह कोकण विभागात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातूनही पावसाने काढता पाय घेतला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात हलका पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागांत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
7/7
अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. राज्यातील सर्वच ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे; मात्र विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. वातावरणातील बदलामुळे दमटपणा निर्माण झाला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: राज्यातील 4 जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल