TRENDING:

Weather Alert: वादळी वारे आणि मुसळधार पाऊस इज बॅक, पुढील 24 तासांसाठी मोठा अलर्ट

Last Updated:
उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 8 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
वादळी वारे आणि मुसळधार पाऊस इज बॅक, पुढील 24 तासांसाठी मोठा अलर्ट
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 8 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार तर रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईत मध्यम पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाट भाग इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये विजांसह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये ही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर बीडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
7/7
विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम विदर्भात सामान्यतः आकाश ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वादळी वारे आणि मुसळधार पाऊस इज बॅक, पुढील 24 तासांसाठी मोठा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल