ना पाऊस पडला, ना पूर आला! तरी हडपसरमध्ये रस्त्यांवर भरलं पाणीच पाणी; नक्की काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मध्यरात्री हडपसर परिसरात जणू महापूर आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मगरपट्टा सिटीच्या मागील गेटजवळ असलेल्या मुठा उजव्या कालव्याची (कॅनल) भिंत अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले.
advertisement
1/7

उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना आणि पुण्यात पावसाचा थेंबही नसताना, मध्यरात्री हडपसर परिसरात जणू महापूर आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मगरपट्टा सिटीच्या मागील गेटजवळ असलेल्या मुठा उजव्या कालव्याची (कॅनल) भिंत अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले.
advertisement
2/7
यामुळे हडपसर, मगरपट्टा आणि कोरेगाव पार्कला जोडणारा मुख्य रस्ता अक्षरशः जलमय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास मगरपट्टा ते कोरेगाव पार्क दरम्यानच्या कालव्याला भगदाड पडले.
advertisement
3/7
पाण्याची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वेळातच रस्त्याला नदीचे स्वरूप आले. मगरपट्टा सिटीच्या अंतर्गत भागांत आणि लगतच्या सोसायट्यांमध्येही पाणी घुसल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
अचानक आलेल्या या लोंढ्यामुळे नागरिक काही काळ गोंधळात होते. या घटनेमुळे हडपसर परिसरातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली.
advertisement
5/7
अनेक वाहने पाण्यात अडकल्याने वाहनचालकांचे हाल झाले. जलसंपदा विभाग आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाण्याचा विसर्ग थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
6/7
मात्र, तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यात यापूर्वीही मुठा कालवा फुटण्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
advertisement
7/7
ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे पाणी वाया जाणे शहरासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
ना पाऊस पडला, ना पूर आला! तरी हडपसरमध्ये रस्त्यांवर भरलं पाणीच पाणी; नक्की काय घडलं?