TRENDING:

Weather Report: पुणे तापलं! पारा 39 अंशांवर, सोलापुरात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather update: गेल्या काही काळात पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पुढील काही काळात तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये.  
advertisement
1/7
पुणे तापलं! पारा 39 अंशांवर, सोलापुरात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज
मार्च महिन्यात राज्यातील तापमानात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. काही जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रातील तापमान आणि हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुण्यातील तापमानात वाढ होऊन तेथील कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. आज मुख्यतः निरभ्र आकाश राहील. पुढील 24 तासांत पुण्यातील तापमानात अंशतः घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 
advertisement
3/7
साताऱ्यातील कमाल तापमान आज 37 अंश तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील तापमानात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. साताऱ्यात आज दुपारी किंवा सायंकाळचा वेळी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. 
advertisement
4/7
सांगलीतील तापमानात वाढ झाल्याने तेथील कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. आज दुपारी किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत सांगलीतील तापमानात वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 
advertisement
5/7
सोलापुरात आज कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत सोलापुरातील तापमानात वाढ होऊन ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 
advertisement
6/7
कोल्हापुरातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 33 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. आज दुपारी किंवा सायंकाळनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात पुढील काही काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Report: पुणे तापलं! पारा 39 अंशांवर, सोलापुरात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल