TRENDING:

शास्त्रात स्पष्टच सांगितलंय, देवाला आवडत नाहीत 'या' गोष्टी, तरीही 99% लोक करतात चूक!

Last Updated:
आपण सर्वजण देवाची भक्ती करतो, मनोभावे पूजा करतो आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध वस्तू अर्पण करतो. मात्र, अनेकदा माहितीच्या अभावामुळे आपण अशा काही गोष्टी देवाच्या चरणी वाहतो, ज्या शास्त्रानुसार 'निषिद्ध' मानल्या गेल्या आहेत.
advertisement
1/7
शास्त्रात स्पष्टच सांगितलंय, देवाला आवडत नाहीत 'या' गोष्टी, 99% लोक करतात चूक!
आपण सर्वजण देवाची भक्ती करतो, मनोभावे पूजा करतो आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध वस्तू अर्पण करतो. मात्र, अनेकदा माहितीच्या अभावामुळे आपण अशा काही गोष्टी देवाच्या चरणी वाहतो, ज्या शास्त्रानुसार 'निषिद्ध' मानल्या गेल्या आहेत. "भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा असतो" हे जरी खरे असले, तरी शास्त्रात प्रत्येक देवतेसाठी काही विशिष्ट नियम सांगितले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आणि कधीकधी नकारात्मक परिणामही सोसावे लागतात.
advertisement
2/7
महादेवाला तुळस अर्पण करणे: भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, परंतु महादेवाच्या पूजेत तुळस अर्पण करणे वर्ज्य आहे. पौराणिक कथेनुसार, महादेवांनी तुळशीचा पती असुर जालंधर याचा वध केला होता, त्यामुळे शिवपूजेत तुळस वापरली जात नाही.
advertisement
3/7
गणपतीला तुळशीची पाने: गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत, मात्र तुळस गणपतीला अर्पण करू नये. केवळ 'गणेश चतुर्थी' या एकाच दिवशी गणपतीला तुळस वाहता येते, इतर दिवशी नाही. असे केल्याने बुध ग्रहाचे दोष निर्माण होऊ शकतात.
advertisement
4/7
तुटलेले तांदूळ (अक्षता): देवाला अक्षता अर्पण करताना त्या नेहमी अखंड असाव्यात. तुटलेले तांदूळ कधीही देवाला अर्पण करू नयेत. तुटलेले तांदूळ हे अपूर्णतेचे प्रतीक मानले जातात आणि यामुळे पूजेचे शुभ फळ मिळत नाही.
advertisement
5/7
शंखाने महादेवाचा अभिषेक: भगवान विष्णूंच्या पूजेत शंख आवश्यक असतो, मात्र महादेवाचा जलाभिषेक करताना कधीही शंखाचा वापर करू नये. महादेवांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता, जो शंखाचा रूपाने जन्माला आला होता, म्हणून शिवपूजेत शंख निषिद्ध आहे.
advertisement
6/7
महादेवाला हळद आणि कुंकू: हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. भगवान शिव हे वैराग्य आणि त्यागाचे प्रतीक आहेत, तसेच शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हळद, कुंकू किंवा रोली शिवलिंगावर अर्पण करू नये. त्याऐवजी भस्म किंवा पांढऱ्या चंदनाचा वापर करावा.
advertisement
7/7
केतकी आणि केवड्याचे फूल: भगवान विष्णूंना केवडा प्रिय असू शकतो, परंतु महादेवाच्या पूजेत केतकी आणि केवड्याचे फूल कधीही वापरू नये. ब्रह्मदेवाच्या असत्याला साथ दिल्याने महादेवांनी केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून कायमचे बाद केले आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शास्त्रात स्पष्टच सांगितलंय, देवाला आवडत नाहीत 'या' गोष्टी, तरीही 99% लोक करतात चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल