चमकदार त्वचेसाठी योग्य आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे सांगितलेले जिन्नस आहारात समाविष्ट केल्यानं त्वचेचं चांगलं पोषण होईल आणि चेहऱ्यावर चांगली चमक राहिल. जाणून घेऊया हे पदार्थ आणि त्यांची उपयुक्तता.
Thyroid : केवळ स्त्रिया नाही पुरुषांनाही असतो थायरॉईडचा धोका, जाणून घ्या लक्षणं
अॅव्होकॅडो - अॅव्होकॅडो खाणं त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्यात हेल्दी फॅट्स म्हणजे निरोगी चरबी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. या घटकांमुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळतं आणि
advertisement
ब्लूबेरी - ब्लूबेरीमधे व्हिटॅमिन सी आणि अँथोसायनिन सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. सूज कमी करण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहेत. त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी, आहारात ब्लूबेरीचा समावेश करू शकता.
अक्रोड - अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. यात ओमेगा-३ फॅटी एसिड भरपूर प्रमाणात असतं, यामुळे त्वचा हायड्रेटेड, गुळगुळीत आणि मऊ राहण्यास मदत होते.
Winter Care : हिवाळ्यासाठी आरोग्य मंत्र, या त्रिकूटानं राहिल प्रतिकारशक्ती उत्तम
गाजर - गाजरामधे असलेलं बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी यामुळे त्वचेचा रंग उजळतो. मुरुमही कमी होतात.
ग्रीन टी - ग्रीन टी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यातील पॉलीफेनॉल कोलेजनचं उत्पादन वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. यामुळे त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसण्याची प्रक्रिया मंदावते आणि चेहरा अधिक निरोगी आणि चमकदार दिसतो.
