Alochol : घरीच 31 चं सेलिब्रेशन करताय? पाहुण्यांसाठी बनवा 'हे' 5 सोपे आणि स्वस्त कॉकटेल्स; सगळेच करतील वाहवाह!
- Published by:Devika Shinde
Last Updated:
घरी पार्टी म्हटली की जेवण तर होतं, पण ड्रिंक्सचं काय? जर तुम्हाला साधी दारू पिण्याऐवजी काहीतरी 'क्लासी' आणि चविष्ट ट्राय करायचं असेल, तर तुम्ही घरच्या घरी अप्रतिम कॉकटेल्स (Cocktails) बनवू शकता.
advertisement
1/9

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. अनेकजण 31 डिसेंबरच्या रात्री पब किंवा हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करणं पसंत करतात. पण बाहेरची गर्दी, ट्रॅफिक जॅम, महागडी बिलं आणि वेळेचं बंधन यांमुळे आजकाल अनेक लोक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हाऊस पार्टी' (House Party) करण्याला प्राधान्य देत आहेत.
advertisement
2/9
घरी पार्टी म्हटली की जेवण तर होतं, पण ड्रिंक्सचं काय? जर तुम्हाला साधी दारू पिण्याऐवजी काहीतरी 'क्लासी' आणि चविष्ट ट्राय करायचं असेल, तर तुम्ही घरच्या घरी अप्रतिम कॉकटेल्स (Cocktails) बनवू शकता. यासाठी तुम्हाला प्रोफेशनल 'बारटेंडर' असण्याची गरज नाही. पण आता हे कसे बनवायचे चला पाहू काही ड्रिंक्स ज्यामुळे तुमची पार्टीहोईल एकदम पर्फेक्ट.
advertisement
3/9
1. देसी मसाला व्हिस्की (Whisky Sour with a Twist)जर तुमच्या पाहुण्यांना व्हिस्की आवडत असेल, तर तिला थोडा मराठमोळा किंवा देसी तडका देऊन सर्व्ह करा.साहित्य: व्हिस्की (60 मिली), लिंबाचा रस, साखर पाक (Sugar Syrup), थोडा चाट मसाला आणि बर्फ.कसे बनवाल: एका ग्लासमध्ये व्हिस्की घेऊन त्यात लिंबाचा रस आणि साखर पाक मिसळा. वरून चिमूटभर चाट मसाला टाका आणि भरपूर बर्फ घालून सर्व्ह करा. हा 'खट्टा-मिठा' स्वाद सर्वांना नक्कीच आवडेल.
advertisement
4/9
2. क्लासिक वोडका लेमोनेड (Classic Vodka Lemonade)वोडका हे सर्वात अष्टपैलू ड्रिंक आहे. हे बनवायला अत्यंत सोपं आणि स्वस्त पडतं.साहित्य: वोडका (60 मिली), लिंबू सरबत (किंवा लिमका/स्प्राइट), पुदिन्याची पानं आणि बर्फ.कसे बनवाल: ग्लासमध्ये वोडका टाका, त्यात थंडगार लिंबू सरबत किंवा स्प्राइट ओता. वरून पुदिन्याची पाने हाताने चुरडून टाका. हे ड्रिंक दिसायलाही भारी दिसतं आणि प्यायलाही रिफ्रेशिंग असतं.
advertisement
5/9
3. रम अँड कोक विथ लेमन (The Cuba Libre)बऱ्याच लोकांना ओल्ड मंक किंवा डार्क रम आवडते. साधी रम-कोक पिण्यापेक्षा त्याला थोडं स्टाईलमध्ये बनवा.साहित्य: डार्क रम (60 मिली), कोका-कोला, लिंबाची एक चकती (Lemon Slice) आणि बर्फ.कसे बनवाल: ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाका, त्यात रम ओता आणि उरलेला ग्लास कोका-कोलाने भरा. शेवटी त्यात लिंबाचा रस पिळा आणि लिंबाची चकती ग्लासच्या कडेला लावा.
advertisement
6/9
4. जिंजर जीन (Gin & Ginger Ale)जीन (Gin) हे सध्या तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. याचा हर्बल स्वाद पार्टीची रंगत वाढवतो.साहित्य: जीन (60 मिली), जिंजर एल (Ginger Ale) किंवा साधा आल्याचा रस + सोडा, लिंबू.कसे बनवाल: जीनमध्ये थंड जिंजर एल मिक्स करा. जर जिंजर एल नसेल तर सोडा आणि थोडा आल्याचा रस + साखर वापरू शकता. हे कॉकटेल खूप 'सोफिस्टिकेटेड' वाटतं.
advertisement
7/9
5. वाईन सँग्रिया (Easy Red Wine Sangria)जर तुम्हाला थोडं कमी अल्कोहोल आणि फळांचा स्वाद हवा असेल, तर सँग्रिया हा उत्तम पर्याय आहे.साहित्य: रेड वाईन, कापलेली फळे (सफरचंद, संत्री, डाळिंब), थोडा संत्र्याचा रस.कसे बनवाल: एका मोठ्या जॅगमध्ये वाईन आणि कापलेली फळे एकत्र करा. त्यात थोडा संत्र्याचा रस आणि साखर घालून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. तुमचे 'रॉयल' कॉकटेल तयार
advertisement
8/9
पार्टीसाठी काही खास टिप्स:घरच्या पार्टीत बर्फ सर्वात आधी संपतो, त्यामुळे भरपूर बर्फ आधीच तयार ठेवा.ग्लासच्या कडेला लिंबू लावून त्यावर मीठ किंवा तिखट लावल्यास ड्रिंक 'पब'सारखं वाटतं.घरी पार्टी असली तरी अल्कोहोलचं प्रमाण मर्यादित ठेवा. 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' टाळण्यासाठी पाहुण्यांच्या मुक्कामाची सोय करा.
advertisement
9/9
31 ची पार्टी म्हणजे केवळ खर्च नाही, तर मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेला आनंद असतो. हे सोपे कॉकटेल्स तुमच्या सेलिब्रेशनला नक्कीच चार चाँद लावतील
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alochol : घरीच 31 चं सेलिब्रेशन करताय? पाहुण्यांसाठी बनवा 'हे' 5 सोपे आणि स्वस्त कॉकटेल्स; सगळेच करतील वाहवाह!