
छत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांचा घरी सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा किंवा पोहे केले जातात. कारण की हे झटपट असे बनून तयार होतात. जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्ही झटपट असं उपमाचे प्रीमिक्स तयार करू शकता. अगदी झटपट बनवून असं हे उपमा प्रीमिक्स तयार होतं. त्यामध्ये तुम्हाला फक्त गरम पाणी टाकल्यानंतर तुमचा उपमा बनून तयार होतो आणि हे प्रीमिक्स तुम्ही साधारणपणे एक ते दीड महिना बिना फ्रिज साठवून ठेवू शकता. उपमा प्रीमिक्स कसा बनवायचा याचीच रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 19:28 ISTसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. लोणावळा, खंडाळा आणि इतर ठिकाणी पर्यटक फिरायला जात आहेत. त्यामुळे या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:05 ISTआज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. त्यात नाशिकमध्ये आज एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आमदारांचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. बंगल्याचं गेट तोडून संताप व्यक्त करताना उमेदवार दिसले. असे अनेक थरार आज महाराष्ट्राने पाहिले. उमेदवारांकडून आमदारांवर तिकीटं विकल्याचा आरोप झाला.
Last Updated: Dec 30, 2025, 20:50 ISTआज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. पण आज संपूर्ण महाराष्ट्राने नाराजी नाट्य पाहिलं. त्या नाराजी नाट्याचं नाव आहे कुणी तिकीट देता का तिकीट ? तिकीट न मिळालेल्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, पत्ता कापला म्हणून अश्रू ओघळले, काचा फुटल्या, पाठलाग केला, राडे झाले.
Last Updated: Dec 30, 2025, 20:21 ISTमनसे नेते राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यांची उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा संपली आहे. त्यांच्यात दोन तास चर्चा झाली आहे. सोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत होते. चर्चा संपल्यानंतर ते निघाले आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली.
Last Updated: Dec 30, 2025, 19:42 IST