TRENDING:

Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांची नार्को चाचणी करा, दोन वर्षापूर्वीचे धक्कादायक फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट

Last Updated:

Rupali Chakankar : कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या नार्को चाचणीची मागणी करताना खळबळजनक आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : नाशिकचा तथाकथित अंकज्योतिष आणि भोंदू अशोक खरात प्रकरणात नवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. भक्त महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याला अटक करण्यात आली होती. राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप खरात याच्यावर होत आहे. अशातच कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या नार्को चाचणीची मागणी करताना खळबळजनक आरोप केले आहेत.
रुपाली चाकणकरांची नार्को चाचणी करा, दोन वर्षापूर्वीचे धक्कादायक फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट
रुपाली चाकणकरांची नार्को चाचणी करा, दोन वर्षापूर्वीचे धक्कादायक फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट
advertisement

नाशिक महिला अत्याचार प्रकरणात आध्यात्मिक गुरू म्हणावला जाणारा अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. अशोक खरात याने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर या खरातची 'पाद्यपूजा' करत असल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झाल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करताना नार्को चाचणीची मागणी केली आहे.

advertisement

रुपाली चाकणकरांचे धक्कादायक फोटो....

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, त्यांनी काही पीडितांशी संवाद साधला. त्यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. रुपाली चाकणकर या तंत्रमंत्र विद्या करत होत्या, अशी माहिती पीडितेने दिल्याचे अंधारे यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर यांचे २०२४ मधील फोटो यावेळी अंधारे यांनी दाखवले. चाकणकर यांनी २ सप्टेंबर २०२४ ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. ही जखम स्वयंपाक करताना, काम करताना झाली नसावी, असेही अंधारे यांनी म्हटले. जवळपास तीन महिने चाकणकर यांच्या बोटाला बँडेज होते. पीडितीने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तारीख, पंचांग पाहिले. त्यावेळी सोमवती अमावस्या होती, असेही अंधारे यांनी सांगितले. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची नार्को चाचणी करण्याची मागणी अंधारे यांनी केली.

advertisement

खरात-चाकणकरांचे घरगुती संबंध...

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे घरगुती संबंध असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. चाकणकरांचा घरात खरात यांची भाची राहते, असा दावा अंधारे यांनी केला.  आपला आणि खरात यांचा फार संबंध नसल्याचा दावा चाकणकर यांनी केला होता.  त्यावर सुषमा अंधारे पलटवार करत घरगुती संबंध असल्याचा दावा केला.

advertisement

धमक्यांचे फोन....

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

मला वेगवेगळ्या आठ नंबर वरून धमक्याचे फोन आले असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले. मला कालपासून धमक्या येत आहेत. अत्यंत वाईट पद्धतीने भाषा वापरली जात असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. आपल्याला जवळपास ७ वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आले. हे फोन क्रमांक ब्लॉक केले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांची नार्को चाचणी करा, दोन वर्षापूर्वीचे धक्कादायक फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल