TRENDING:

पहाटे 4.50 ची वेळ, 'भय'च्या अभिनेत्रीसोबत मुंबई हायवेवर घडला भयंकर प्रकार, Shocking Video

Last Updated:

Road Rage With Actress : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. जे पाहून कित्येक लोक घाबरले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत पहाटेच्या वेळी हायवेवर भयंकर प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याचे व्हिडीओही पोस्ट केले होते. आता तिने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून कित्येक लोक घाबरले आहेत.
News18
News18
advertisement

ही अभिनेत्री आहे निमिषा नायर, जी  'भय' आणि 'अमर कॉलनी' यासारख्या सीरिज आणि फिल्ममध्ये दिसली. तिच्यासोबत मुंबईच्या हायवेवर जे घडलं ते तिने इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं आहे. तिने सांगितल्यानुसार हायवेवर तिची गाडी अडवण्यात आली आणि नको तोच प्रकार केला आहे.

Dhurandhar 2 ची तिकीट मिळाली नाही? मग OTT वर बघा या 7 बेस्ट क्राइम थ्रिलर, क्लायमॅक्स पाहून पायाखालची जमीन सरकेल

advertisement

अभिनेत्रीने सांगितल्यानुसार ही घटना 17 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. अंधेरीतील तिच्या घरापासून नरिमन पॉईंटपर्यंत एका मैत्रिणीसोहत ती उबर कॅबने प्रवास करत होती. पहाटेचे 4.45 झाले होते. त्यांची कॅब बांद्र्यातील खेरवाडी पुलाजवळ पोहोचली. तेव्हा एक बाईक त्यांच्या कॅबसमोर आली आणि कार अडवून धरली. गाडीला ते पुढेच जाऊ देत नव्हते.

त्यांनी कॅब थांबवण्याचा प्रयत्न केला. कॅबचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि ड्रायव्हरला धमकावलं. ही परिस्थिती पाहून निमिषाने या घटनेचं शूटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र अभिनेत्रीने प्रसंगावधान दाखवत दुचाकीचा नंबर नोंदवून घेतला. व्हिडीओतून माहिती देत निमिषाने सोशल मीडियावर पोलिसांना टॅग करून मदतीची आणि कारवाईची मागणी केली.

advertisement

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला आणि आरोपींच्या नोंदणी क्रमांकांवरून त्यांची ओळख पटवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. खेरवाडी पोलिसांच्या माहितीनुसार, दादर येथील हे तरुण ज्यांचं वय 25 आणि 27 वर्षे आहे.  चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं.

34 कोर्ट केसेस अन् जीवे मारण्याच्या धमक्या! 44 वर्षांपूर्वीच्या फिल्मने देशात आणलेला भूकंप, तरीही कमावलं 225% प्रॉफिट

advertisement

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी त्यांच्या पालकांसोबत पोलीस ठाण्यात आले होते आणि एक दिवस इथेच राहिले. त्यांच्या कुटुंबीयांनीही मुलांकडून चूक झाल्याची कबुली देत भविष्यात असं पुन्हा घडणार नाही, असं आश्वासन दिलं. यानंतर दोन्ही आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

दरम्यान यानंतर निमिषाने पोलिसांचे आभार मानणारा व्हिडीओही पोस्ट केला आहे. तसंच अशा घटनेची तक्रार करणं, त्या सगळ्यांसमोर आणणं ही आपली जबाबदारी असल्याचं म्हणत तिने इतरांनाही अशा गोष्टी शांतपणे हातळा, तुम्ही कायदा हातात घेऊ नका पण कायदेशीर मार्गाचा अवलंब करा, तक्रार करा असं आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
पहाटे 4.50 ची वेळ, 'भय'च्या अभिनेत्रीसोबत मुंबई हायवेवर घडला भयंकर प्रकार, Shocking Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल