TRENDING:

ते कांड करण्यासाठी राजस्थानवरून पुण्यात आला तरुण; सकाळी सकाळी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर उभा राहिला अन्.. पोलीसही चक्रावले

Last Updated:

राजस्थानमधून अफूची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ८४ हजार रुपयांचा अफू जप्त करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड : पुण्यात अंमली पदार्थांची अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने तस्करी होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम राबवली आहे. राजस्थानमधून अफूची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ८४ हजार रुपयांचा अफू जप्त करण्यात आला आहे.
२५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (प्रतिकात्मक फोटो)
२५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

पुणे-सोलापूर महामार्गालगत होतं 'पान शॉप'; ते खाण्याचं पान उघडून बघताच पोलीसही हादरले, दोघांना लगेचच अटक

नेमकी कशी झाली कारवाई?

मंगळवारी (दि. १७) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वडगाव महामार्ग कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. अटकेत असलेल्या आरोपीचे नाव रोशनलाल नारायणलाल जाट (वय २५, रा. चित्तोडगड, राजस्थान) असे आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

advertisement

Pune Accident : गाडीच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू; पुण्यातील महिलेची थेट पोलिसात धाव अन् मोठी कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनलाल हा ९८० ग्रॅम वजनाचा अफू विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगून होता. याबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी पोहोचत तरुणाची झ़डती घेतली. यावेळी त्याच्याकडून तब्बल ७ लाख ८४ हजार रुपयांचा अफू जप्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड परिसरात हा अंमली पदार्थ कोणाला विकला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ते कांड करण्यासाठी राजस्थानवरून पुण्यात आला तरुण; सकाळी सकाळी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर उभा राहिला अन्.. पोलीसही चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल