Instagram वर चॅटिंगचा आनंद होईल द्विगुणित! कंपनीने आणलंय जबरदस्त फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram AI Voice Effects: इंस्टाग्रामचा वापर जास्तीत जास्त लोक करतात. विशेषतः तरुणाई मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम वापरते. आता तरुणाईसाठी गुड न्यूज आहे. कारण इंस्टाग्रामने एक खास फीचर आणलंय.
advertisement
1/5

Instagram AI Voice Effects: सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसतोय. सोशल मीडियामध्ये लोक विविध अॅप्सचा वापर करतात. पण यामध्ये सर्वाधिक वापरले जाणार एक अॅप म्हणजे इंस्टाग्राम आहे. तरुणाई तर या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करते. आता सर्वांसाठी इंस्टाग्रामने गुड न्यूज आणली आहे.
advertisement
2/5
इंस्टाग्रामवर आता चॅटिंग करणे आणखी मजेदार होणार आहे. खरंतर कंपनी डायरेक्ट मेसेजमध्ये व्हॉइस नोटसाठी नवीन AI Voice Effects फीचर घेऊन आली आहे. याच्या मदतीने यूझर व्हॉइस नोट पाठवण्यापूर्वी त्याच्या साउंडसा मॉडिफाय करु शकतील. यामुळे यूझरची बोलण्याची टोन, रिदम आणि इमोशन सेम राहील. मात्र त्या लोकांवर ऑडियो इफेक्ट लावले जाऊ शकतील. ज्यामुळे चॅटिंग करणे आणखी मजेदार आणि इंट्रेस्टिंग होईल.
advertisement
3/5
कसं काम करेल हे फीचर? : AI Voice Effects फीचरच्या मदतीने यूझर्स आपल्या व्हॉइस नोटवर वेगवेगळे कॅरेक्टरचे साउंड इफेक्ट लावू शकतील. कंपनीने सांगितले की, या फीचरच्या मदतीने बोलणे आणकी एक्सप्रेसिव्ह होईल. या फीचरला मेसेजमध्ये कंपोजरमध्येच यूझर्सला किती इफेक्ट्स मिळतील याविषयी कंपनीने सांगितले नाही. मात्र चिकमंक, डेमन, एलियन आणि रोबोट सारखे काही इफेक्ट्सची पुष्टी करण्यात आली आहे.
advertisement
4/5
अशी मजेदार होईल चॅटिंग : एखाद्या यूझरने समोरच्या कॉन्टॅक्टला AI Voice Effects चा मेसेज पाठवला तर तो रिसिव्हरला समजून जाईल की, सेंडरने कोणता इफेक्ट वापरलाय. यानंतरही तुम्हीही त्याच इफेक्टवर टॅप करुन आपला मेसेज त्याच इफेक्टमध्ये रेकॉर्ड करू शकाल. गेल्या काही काळापासून मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर व्हॉइस नोटचे चलन वाढले आहे आणि आता कंपन्या यासाठी नवनवीन टूल्स जोडतेय.
advertisement
5/5
इंस्टाग्रामवरील तुमचे चॅट्स आता प्रायव्हेट राहणार नाहीत : तुम्ही चॅटिंगसाठी इंस्टाग्राम वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट येत आहे. या वर्षी मे महिन्यापासून, कंपनी चॅटिंगमधून एंड-टू-एंड एन्क्रिप्शन संरक्षण काढून टाकत आहे. यानंतर, केवळ रिसिव्हरच नाही, तर पाठवणारा देखील तुमचे चॅट्स पाहू शकेल. इंस्टाग्रामने 2023 मध्ये मेसेजेसमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट जोडला होता आणि आता तो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Instagram वर चॅटिंगचा आनंद होईल द्विगुणित! कंपनीने आणलंय जबरदस्त फीचर