TRENDING:

उन्हाळ्यात फ्रिजमध्ये ठेवा वाटीभर मीठ! अनेकांना माहितीच नाही फायदे, कंपनीही सांगत नाही

Last Updated:
उन्हाळ्यात फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. अशावेळी फ्रिजची काळजी कशी घ्यावी हे आपल्याला माहिती असायलाच हवे. आज आपण अशीच एक ट्रिक जाणून घेणार आहोत. ज्याचा तुम्हाला फ्रिज वापरताना खुप फायदा होईल.
advertisement
1/7
उन्हाळ्यात फ्रिजमध्ये ठेवा वाटीभर मीठ! अनेकांना माहितीच नाही फायदे, कंपनीही सांगत नाही
उन्हाळा सुरू झाला आहे. या काळात फ्रिजचा वापर प्रचंड वाढतो. कारण फ्रिजमध्ये पाणी, शीतपेय आणि उन्हामुळे खराब होणारे पदार्थ आपण यात ठेवतो. फ्रिजचा वापर वाढलेला असताना त्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
advertisement
2/7
उन्हाळ्यामध्ये बाहेरील वातावरण हे उष्ण आणि कोरडं असलं तरीही फ्रिजमध्ये ओलावा राहतो. उन्हाळ्यात आपण पाणी घेणे किंवा इतर थंड पदार्थ घेण्यासाठी वारंवार फ्रिज उघडत असतो. असं केल्याने फ्रिजमधील ओलावा वाढत जातो. फ्रिजमधील ओलावा वाढल्याने यातील भाज्या लवकर खराब होतात. यासोबतच फ्रिजमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. पण हे होऊ नये यासाठी आपल्याकडे एक भारी ट्रिक आहे. जी आपल्याला कोणीच सांगत नाही. अगदी फ्रिज कंपनीही याविषयी कधीच सांगत नाही.
advertisement
3/7
यासाठी एक काम करायचं आहे, फ्रिजमध्ये फक्त एक वाटी मीठ ठेवा. कारण मीठामध्ये ओलावा शोषूण घेण्याचा गुण असतो. तुमच्या फ्रिजमध्ये तुम्ही एक वाटी मीठ भरून ठेवले. तर ते मीठ पूर्ण ओलावा शोषूण घेते. यामुळे फ्रिज आतून कोरडे राहते.
advertisement
4/7
यासोबतच तुम्ही फ्रिजमध्ये जेव्हा वेगवेगळ्या वस्तू ठेवता. तर त्यांचा वास मिळून एक विचित्र दुर्गंधी येते. आपण भाज्या, फळे, शिजवलेले अन्न किंवा डेयरी प्रोडक्ट्स दीर्घ काळ फ्रिजमध्ये ठेवले तर त्यातून गॅस निघतो.
advertisement
5/7
हा गॅस फ्रिजच्या आत पसरतो आणि हळुहळू दुर्गंधी येऊ लागते. मीठ हा वासही शोषूण घेते. ज्यामुळे फ्रिजमधून येणारी दुर्गंधी ही गायब होते. ओलावा आणि दुर्गंधी कमी झाली तर फ्रिजच्या सिस्टमवरील लोडही कमी होतो. लोड कमी झाल्याने फ्रिजची लाइफही वाढते.
advertisement
6/7
मीठ कसे ठेवावे? : एका लहान वाटीमध्ये 100-150 ग्राम मीठ भरून फ्रिजच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. 15-20 दिवसात हे मीठ बदलत जा.कारण मिठाने ओलावा शोषूण घेतल्याने त्याचा परिणाम होत नाही.
advertisement
7/7
चांगला परिणाम मिळावा म्हणून जाड खडे मिठाचा वापर करा. तुम्हाला मीठ वापरायचे नसले तर बेकिंग सोडाही दुर्गंधी दूर करण्यात मदत करतो. हे देखील तुम्ही वाटीत भरुन ठेवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
उन्हाळ्यात फ्रिजमध्ये ठेवा वाटीभर मीठ! अनेकांना माहितीच नाही फायदे, कंपनीही सांगत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल