TRENDING:

ब्रेक फेल झालेला कंटेनर 'इनोव्हा'वर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भीषण अपघाताचे थरकाप उडवणारे PHOTOS

Last Updated:
(संतोष दळवी, प्रतिनिधी) : एका सुसाट कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या भीषण साखळी अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ५ जण जखमी झाले आहेत.
advertisement
1/7
ब्रेक फेल झालेला कंटेनर 'इनोव्हा'वर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भीषण अपघाताचे थरकाप उडवणारे PHOTOS
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला आहे. एक्सप्रेसवेवरुन भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खंडाळा येथील आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला.
advertisement
2/7
यात एका सुसाट कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या भीषण साखळी अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ५ जण जखमी झाले आहेत.
advertisement
3/7
हा अपघात इतका भीषण होता की, नियंत्रणाबाहेर गेलेला कंटेनर शेजारून जाणाऱ्या इनोव्हा कारवरच उलटला. मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका अवजड कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले.
advertisement
4/7
चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर पलटी होऊन थेट एका कारवर कोसळला.
advertisement
5/7
कंटेनरखाली दबल्या गेल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. या अपघातात कंटेनर चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रेस्क्यू करून रुग्णालयात दाखल केले आहे.
advertisement
6/7
या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
7/7
क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
ब्रेक फेल झालेला कंटेनर 'इनोव्हा'वर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भीषण अपघाताचे थरकाप उडवणारे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल