Suraj Chavan : लग्नाच्या 3 महिन्यांनी सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार! बायको संजनाकडे Good News?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chava : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण लग्नाच्या तीन महिन्यात बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याची बायको संजनाकडे खरंच गुड न्यूज?
advertisement
1/10

रील स्टार आणि 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या कामामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे.
advertisement
2/10
सूरज चव्हाणने त्याच्या मामाची मुलगी संजनाबरोबर डिसेंबर महिन्यात लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अवघे 3 महिने पूर्ण झाले आहेत.
advertisement
3/10
लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सूरज आणि संजना यांच्या घरी पाळणा हलणार असल्याची चर्चा रंगली आहे. सूरजची बायको संजनाकडे गुड न्यूज असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
4/10
सूरज चव्हाणच्या बायकोनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. संजना चव्हाण हिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
5/10
संजनाने नुकतंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये तिने नेसलेल्या साडीत तिचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
advertisement
6/10
संजना चव्हाणने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी अभिनंदन अशा कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सूरज आणि संजना आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला आहे.
advertisement
7/10
इतकंच नाही तर राजश्री मराठीने सोशल मीडिया पेजवरूनही यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी दुजोरा मिळाला आहे.
advertisement
8/10
दरम्यान सूरज चव्हाण आणि संजना चव्हाण यांच्याकडून अद्याप या बाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही चर्चा खरी आहे की केवळ अफवा याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
advertisement
9/10
सूरज आणि संजना लग्नानंतर त्यांच्या नव्या घरी राहत आहेत. लग्नानंतर त्यांचा आनंदाचा संसार सुरू आहे. दोघेही एकत्र रील्स बनवतात. त्यांचे अनेक फोटोशूट देखील शेअर करत असतात. सूरज आणि संजना यांच्या जोडीला चाहत्यांचं प्रेम मिळतंय.
advertisement
10/10
बिग बॉस मराठी 5 जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने त्याचं घर बांधलं. या घरासाठी त्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी मदत केली. आधी करिअर मग लग्न हे शब्द सूरज चव्हाणने खरे केले. बिग बॉसनंतर त्याचा झापूक झुपूक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर काही महिन्यात त्याने लग्न केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan : लग्नाच्या 3 महिन्यांनी सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार! बायको संजनाकडे Good News?