TRENDING:

वडील शेतकरी, आळंदीत शिक्षण; स्वत:वर वार करून घेणारे तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज कोण?

Last Updated:
आदिनाथ महाराज शास्त्री विराजमान झाले तेव्हापासून गडावरील सप्ताह, धार्मिक कार्यक्रम, गडाच्या विकासाची पूर्ण जबाबदारी घेतली. आळंदी, पंढरपूर येथील दिंडी उत्सव सर्व महाराज पाहात आहेत.
advertisement
1/9
वडील शेतकरी, आळंदीत शिक्षण; स्वत:वर वार करून घेणारे तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज कोण?
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वत:वरच वार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर मोठी खळबळ उडाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयता उपचार सुरू आहेत. बीड,अहिल्यानगर जिल्ह्यासह पाथर्डी परिसरात मोठा भक्त परिवार असलेले महाराज नेमके आहेत तरी कोण? याविषयी जाणून घेऊया...
advertisement
2/9
बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी गावातील मूळ रहिवासी असलेले आदिनाथ मारुती सोनवणे हे अध्यात्मिक आवड असल्याने आळंदी येथे शिक्षणासाठी गेले त्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत चार वर्ष अध्यात्माचे शिक्षण घेऊन साधनेला सुरुवात केली.
advertisement
3/9
अध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा येथील तारकेश्वर गड या ठिकाणी श्री संत नारायण महाराज यांच्या सेवेत दाखल झाले. 14 मे 2011 साली श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे पहिले महंत नारायण महाराज यांच्या निधनानंतर दुसरे महंत म्हणून गादीवर आदिनाथ महाराज शास्त्री विराजमान झाले.
advertisement
4/9
आदिनाथ महाराज शास्त्री विराजमान झाले तेव्हापासून गडावरील सप्ताह, धार्मिक कार्यक्रम, गडाच्या विकासाची पूर्ण जबाबदारी घेतली. आळंदी, पंढरपूर येथील दिंडी उत्सव सर्व महाराज पाहात आहेत.
advertisement
5/9
संत नारायण महाराज यांच्या 2025 च्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहिले होते.
advertisement
6/9
आदिनाथ महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असून आष्टी तालुक्यातील बाबी गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी असून अध्यात्मिक आवड असल्याने आळंदी येथे शिक्षण घेतले.
advertisement
7/9
अहिल्यनगर बीड जिल्ह्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून उपमुख्यमंत्री असताना स्व.गोपीनाथ मुंडे यांनी भेट दिली होती.
advertisement
8/9
आदिनाथ महाराजांचे एक भाऊ अशोक महाराज सोनवणे हे आळंदीमध्ये राहतात. गावाकडे वडिलोपार्जित शेती आहेत.
advertisement
9/9
आई जानकी मारुती सोनवणे या भावाकडे आळंदीला असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
वडील शेतकरी, आळंदीत शिक्षण; स्वत:वर वार करून घेणारे तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल