TRENDING:

पाणी पिण्याचेही असतात नियम! 2.7 की 3 लिटर? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला नक्की किती पाण्याची गरज आहे? वाचा सविस्तर

Last Updated:
नक्की दिवसातून किती पाणी प्यावे? फक्त तहान लागल्यावरच पाणी पिणे पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे देणारा एक विशेष कार्यक्रम नुकताच तपोवन रोड येथील समाजकल्याण केंद्रात पार पडला. यावेळी आरोग्यसल्लागार जितेंद्र नांदुरकर यांनी उन्हाळ्यातील जलसंजीवनीबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे.
advertisement
1/9
पाणी पिण्याचेही असतात नियम! 2.7 की 3 लिटर? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला नक्की किती पाण्याची गरज आहे? वाचा सविस्तर
मार्च महिना संपत आला की सूर्यनारायण आपला प्रकोप दाखवायला सुरुवात करतात. वाढत्या उन्हामुळे घामाच्या धारा वाहू लागतात आणि काही वेळातच आपल्याला थकवा जाणवू लागतो. या दिवसात आपण आरोग्याची कितीही काळजी घेतली, तरी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते, ती म्हणजे हायड्रेशन. आपल्या शरीराचे इंजिन सुरळीत चालण्यासाठी पाण्याची भूमिका इंधनासारखी असते.
advertisement
2/9
पण, नक्की दिवसातून किती पाणी प्यावे? फक्त तहान लागल्यावरच पाणी पिणे पुरेसे आहे का? या प्रश्नांची उत्तरे देणारा एक विशेष कार्यक्रम नुकताच तपोवन रोड येथील समाजकल्याण केंद्रात पार पडला. यावेळी आरोग्यसल्लागार जितेंद्र नांदुरकर यांनी उन्हाळ्यातील जलसंजीवनीबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी खास येथे देत आहोत.
advertisement
3/9
तुमच्या वजनानुसार ठरवा पाण्याचे प्रमाणअनेकांना वाटते की दिवसातून 2-3 लिटर पाणी पिणे सर्वांसाठी सारखेच असते. मात्र, नांदुरकर यांनी एक सोपे गणित मांडले आहे. ते म्हणतात, "तुमच्या शरीराची पाण्याची गरज ही तुमच्या वजनावर अवलंबून असते. साधारणपणे दर 20 किलो वजनामागे 1 लिटर पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते. म्हणजेच तुमचे वजन 60 किलो असेल, तर तुम्हाला किमान 3 लिटर पाण्याची गरज आहे."
advertisement
4/9
याव्यतिरिक्त, उन्हाळ्यात कष्टाचे काम किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी हे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे पुरुषांनी 3 लिटर आणि महिलांनी 2.7 लिटर द्रवपदार्थ घेणे आरोग्यदायी मानले जाते.
advertisement
5/9
तहान लागण्याची वाट पाहू नकाउन्हाळ्यात सर्वात मोठी चूक ही होते की, आपण तहान लागल्याशिवाय पाणी पीत नाही. नांदुरकर यांच्या मते, ही सवय बदलणे गरजेचे आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी दर 20 ते 30 मिनिटांनी थोडेथोडे पाणी पीत राहिले पाहिजे.
advertisement
6/9
हे का महत्त्वाचे आहे?जेव्हा आपल्याला घाम येतो, तेव्हा शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते आणि आपल्याला थंडावा मिळतो. पण शरीरात पाणीच नसेल, तर घाम येण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया मंदावते. परिणामी शरीराचे तापमान धोकादायक पातळीवर वाढून हीट स्ट्रोक किंवा उष्माघाताचा धोका निर्माण होतो.
advertisement
7/9
काय प्यावे आणि काय टाळावे?फक्त साधे पाणीच नाही, तर आहारात इतर द्रवपदार्थांचा समावेश करणेही उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक आणि लिंबू सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात.अशावेळी चहा, कॉफी आणि अति साखरेची शीतपेये (Soft Drinks) कमी करा. ही पेये शरीरातील पाण्याचे प्रमाण उलट कमी करतात, त्यामुळे हे टाळावे.
advertisement
8/9
जास्त पाणी पिण्याचे 'मॅजिकल' फायदेकेवळ तहान भागवण्यासाठीच नाही, तर आरोग्याच्या इतर पैलूंसाठीही पाणी महत्त्वाचे आहे.मुबलक पाण्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते, ज्यामुळे उन्हाळ्यातील कोरडेपणा कमी होऊन चेहरा तजेलदार दिसतो.पाणी शरीरातील विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालते.उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. पुरेसे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
advertisement
9/9
उन्हाळ्याच्या या लाटेत स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. आरोग्यसल्लागार जितेंद्र नांदुरकर यांनी दिलेला हा सल्ला केवळ माहिती नसून ते निरोगी राहण्याचे गुपित आहे. त्यामुळे आजपासूनच पाणी पिण्याचा अलार्म' सेट करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पाणी पिण्याचेही असतात नियम! 2.7 की 3 लिटर? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला नक्की किती पाण्याची गरज आहे? वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल