TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच इतकं तापलं, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
सोमवारी मुंबईसह, ठाणे आणि रायगडला उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांना सध्या प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
1/5
उष्णतेचा कहर, कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच इतकं तापलं, हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट हवामान खात्याने दिला होता. सोमवारी मुंबईसह, ठाणे आणि रायगडला उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांना सध्या प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
2/5
कल्याण-डोंबिवलीमध्ये आज 9 मार्च रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
advertisement
3/5
त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान सर्वाधिक उष्णतेची तीव्रता राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
4/5
दरम्यान, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील ही उष्णतेची लाट मार्च महिन्यातच सुरू झाली आहे. काही ठिकाणी 41-43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले असून, कल्याण-डोंबिवलीतही पुढील काही दिवस तापमान 42 -44 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
5/5
त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे, दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा कहर, कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच इतकं तापलं, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल