TRENDING:

आधी अर्जुन, मग हर्ष अन् आता... भर पार्टीत मिस्ट्री मॅनसोबत मलायकाचा कोझी डान्स, VIDEO ने इंटरनेटवर लावली आग

Last Updated:
Malaika Arora Viral Video: एका मिस्ट्री मॅनसोबत मलायकाचा डान्स करतानाचा आणि त्याच्या मिठीमध्ये कोझी होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
advertisement
1/11
आधी अर्जुन, मग हर्ष अन् आता... भर पार्टीत मिस्ट्री मॅनसोबत मलायकाचा कोझी डान्स
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात कॉन्ट्रोव्हर्शिअल पण तितकीच पॉप्युलर असलेली मलायका अरोरा, नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
advertisement
2/11
तिचे बोल्ड फोटोशूट अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात, पण गेल्या काही काळापासून ती तिच्या फोटोंपेक्षाही तिच्या रिलेशनशिप्समुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आहे.
advertisement
3/11
अर्जुन कपूर आणि तिची जोडी बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. मात्र, अचानक या जोडप्याने आपला ब्रेकअप झाल्याचे सांगत, आपले मार्ग वेगळे केले.
advertisement
4/11
या घटनेला काही काळ उलटत नाही, तोच मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती तिच्यापेक्षा १९ वर्ष लहान व्यक्तीसोबत कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसली.
advertisement
5/11
पण काल रात्री मुंबईत पार पडलेल्या एका हाय-प्रोफाइल पार्टीत काहीतरी वेगळंच घडलं. एका मिस्ट्री मॅनसोबत मलायकाचा डान्स करतानाचा आणि त्याच्या मिठीमध्ये कोझी होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
advertisement
6/11
‘स्वीनी बॉम्बे’ या मलायकाच्या नवीन रेस्टॉरंटच्या ग्रँड लॉन्चिंगसाठी तिने खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये मलायकाचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. दरम्यान, या पार्टीमध्ये मलायकाला एका वेगळ्याच व्यक्तीसोबत अशाप्रकारे डान्स करताना पाहून कोणालाच काही कळेनासं झालं.
advertisement
7/11
नेटकऱ्यांनी लगेच तर्क-वितर्क लढवायला सुरुवात केली, "हा हर्ष मेहता तर नाही, मग मलायकाचा हा नवा जोडीदार नक्की कोण?" हा तरुण दुसरा कोणी नसून प्रसिद्ध रिॲलिटी शो स्प्लिट्सविलाचा स्पर्धक सोराब बेदी आहे.
advertisement
8/11
सोराब आणि मलायका यांच्यातील केमिस्ट्री पाहून अनेकांना वाटलं की मलायकाच्या आयुष्यात पुन्हा कोणाची तरी एन्ट्री झालीय. पण सत्य वेगळं आहे. सोराबने स्वतः या पार्टीचे फोटो शेअर करत मलायकाचं अभिनंदन केलंय.
advertisement
9/11
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यात प्रेमाचं असं काहीही नसून ते केवळ चांगले मित्र आहेत. पार्टीत एन्जॉय करतानाचा तो एक साधा व्हिडिओ होता, ज्याला सोशल मीडियाने वेगळंच वळण दिलं.
advertisement
10/11
विशेष म्हणजे, याच पार्टीत मलायकाचा कथित बॉयफ्रेंड हर्ष मेहता देखील उपस्थित होता. पार्टी संपल्यानंतर मलायका आणि हर्ष एकाच गाडीतून बाहेर पडताना दिसले, ज्यावरून त्यांच्यातील नातं अजूनही घट्ट असल्याचं स्पष्ट झालंय.
advertisement
11/11
५२ वर्षांची मलायका आणि ३३ वर्षांचा हर्ष यांच्यात १९ वर्षांचं अंतर आहे, पण त्यांच्या रोममधील व्हॅलेंटाईन डेच्या फोटोंनी आधीच इंटरनेटवर आग लावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी अर्जुन, मग हर्ष अन् आता... भर पार्टीत मिस्ट्री मॅनसोबत मलायकाचा कोझी डान्स, VIDEO ने इंटरनेटवर लावली आग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल