TRENDING:

Trisha Krishnan Networth: अलिशान बंगला, लक्झरियस कार्स, करोडोंची मालकिण आहे तृषा कृष्णन; अभिनेत्रीचे मानधन किती?

Last Updated:
अभिनेत्री तृषा कृष्णन ही टॉलिवूड इंडस्ट्रील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिच्या स्क्रिन प्रिजेंसची फक्त सेलिब्रिटींमध्येच नाही तर, चाहत्यांमध्येही जोरदार चर्चा होताना दिसते. तृषाने तिच्या फिल्मी करियरमध्ये तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर, मेहनतीवर आणि सतत मिळणाऱ्या यशामुळे, त्रिशा आता टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
1/7
अलिशान बंगला, लक्झरियस कार्स, करोडोंची मालकिण आहे तृषा कृष्णन; मानधन किती?
तृषा कृष्णन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अभिनेता विजय थलापथीच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. असा दावा केला जात आहे की, विजय तिला फसवत आहे. संगीताचे असे म्हणणे आहे की, विजयचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टॉलिवूड अभिनेत्री तृषा कृष्णन असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
2/7
तृषा कृष्णन तामिळ इंडस्ट्रीतील अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांतील तिची लोकप्रियता आणि सोबतच तिची लग्झरियस लाईफस्टाईल यामुळे ती जोरदार चर्चेत राहते. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, तृषा कृष्णनकडे 90 कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे. तिने चित्रपट, जाहिरात आणि ब्रँड अँडोर्समेंटच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
3/7
2000 पासून टॉलिवूड इंडस्ट्रीपासून अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करियरची सुरूवात केली होती. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिचा टॉप सेलिब्रिटींमध्ये समावेश होतो. टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रीमध्ये तृषाचा समावेश होतो. निर्माते तिला बिग बजेट चित्रपटांमध्ये कास्ट आवर्जुन करतात.
advertisement
4/7
तृषा कृष्णन एका चित्रपटासाठी तब्बल 9 कोटी रूपये फी घेत असल्याची चर्चा आहे. कमल हासन आणि मणिरत्नम यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटासाठी तृषाने तब्बल 12 कोटी इतकं मानधन मिळालं. निर्मात्यांकडून तृषाला बिग बजेट चित्रपटांमध्ये कास्ट करण्यासाठी प्रोड्युसर कायमच उत्सुक असतात. तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
advertisement
5/7
तिने अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. Ghilli, Vinnaithaandi Varuvaayaa आणि Ponniyin Selvan: I सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये समावेश आहे. या चित्रपटांनी तिची लोकप्रियता एका वेगळ्याच उंचीवर नेली आहे.
advertisement
6/7
तृषा कृष्णनच्या नावावर अनेक लक्झरियस घरांचा समावेश आहे. तिचे घर चेन्नईच्या एका आलिशान भागात आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी असल्याचे सांगितले जाते. त्या परिसरात अनेक टॉलिवूडमधले सेलिब्रिटी आणि बडे उद्योगपतींचे घरं आहेत.
advertisement
7/7
चेन्नई व्यतिरिक्त, तृषाकडे हैदराबादमध्येही एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे 6 कोटी रूपये इतकी आहे. त्या परिसरातही हाय प्रोफाईल लोकं राहतात. जिथे कायमच सेक्युरिटी आणि प्रायवसीचा खूप आदर केला जातो. अभिनेत्रीकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, ती रिअल इस्टेट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Trisha Krishnan Networth: अलिशान बंगला, लक्झरियस कार्स, करोडोंची मालकिण आहे तृषा कृष्णन; अभिनेत्रीचे मानधन किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल