खरं तर टीम इंडियाकडून अर्शदिप सिंह 11 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता. यावेळी न्यूझीलंडचा डाव डेरी मिचेल आणि मिचेल सँटनर सावरत होते. यावेळी अर्शदिपने ओव्हरचा चौथा बॉल वाईडच्या दिशेने टाकला होता. मात्र डेरील मिचेलने तो बॉल मारला होता. पण हा बॉल फारसा दूर न जाता अर्शदिपच्या हातात गेला होता. या दरम्यान डेरी मिचेल हा क्रिजमध्ये होता असे असताना देखील अर्शदिपने स्टम्पवर बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता.मात्र हा बॉल चूकुन जाऊन मिचेलच्या मांडीला लागला होता.त्यामुळे मिचेल त्याच्यावर चांगलाच चवथाळला होता.
advertisement
मिचेलचा हा आक्रामकपणा पाहून अर्शदिप त्याला काहीच बोलला नाही आणि गोलंदाजी करायला निघून गेला.या दरम्यान अर्शदिपच्या या कृतीवर मिचेलने अंपायरकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर अंपायरने जाऊन अर्शदिपला समज दिली. या दरम्यान कॅप्टन सूर्याने देखील वादात उडी घेत मिचेलची माफी मागितली होती. त्यानंतर स्वत: अर्शदिपने देखील त्याच्याशी शेकहँड केला होता. त्यामुळे जवळपास वादावर पडदा पडला होता.
पण या हायव्होल्टेज भांडणानंतर हे दोघेही पुन्हा समोरासमोर येतील अशी शक्यता फारच कमी होती. पण तरीही हे दोघेही एकत्र आले, त्यांनी एकमेकांशी चर्चा केली, दोघांच्या चेहऱ्यावर मोठं हास्य होते.एकमेकांना शेकहँड आणि गळाभेटही घेतली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने या वादावर पडदा पडला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
