TRENDING:

Kitchen Tips : पाण्याची बाटली धुतली तरी वास जात नाही? हे सोपे उपाय करून पाहा, दुर्गंध होईल गायब

Last Updated:
हायड्रेटेड राहण्यासाठी आपण सतत पाणी पितो, ही चांगली सवय आहे. उन्हाळ्यात तर आवर्जून जवळ पाण्याची बाटली असावी. पण, कधी विचार केलाय का की, ज्या बाटलीतून तुम्ही पाणी पिऊन आरोग्य जपत आहात, तीच बाटली तुमच्या आजाराला निमंत्रण देत तर नाही ना?
advertisement
1/9
पाण्याची बाटली धुतली तरी वास जात नाही? हे सोपे उपाय करून पाहा, दुर्गंध होईल गायब
सकाळी ऑफिसला निघताना असो, मुलांची स्कूल बॅग भरताना असो किंवा जिमला जाताना... आपल्या बॅगेत एक वस्तू हमखास असते, ती म्हणजे पाण्याची बाटली. 'हायड्रेटेड' राहण्यासाठी आपण सतत पाणी पितो, ही चांगली सवय आहे. उन्हाळ्यात तर आवर्जून जवळ पाण्याची बाटली असावी. पण, कधी विचार केलाय का की, ज्या बाटलीतून तुम्ही पाणी पिऊन आरोग्य जपत आहात, तीच बाटली तुमच्या आजाराला निमंत्रण देत तर नाही ना?
advertisement
2/9
आपण पिण्याचे पाणी शुद्ध असावे याकडे खूप लक्ष देतो, पण ज्या बाटलीत ते पाणी साठवतो, त्या बाटलीच्या स्वच्छतेकडे मात्र सर्रास दुर्लक्ष करतो. अनेक दिवस बाटली न धुता वापरणे हे केवळ अस्वच्छच नाही, तर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. तुमच्या पाण्याच्या बाटलीत दडलेल्या धोक्याबद्दल आणि ती स्वच्छ करण्याच्या 'स्मार्ट' पद्धतींबद्दल आपण आज जाणून घेऊया.
advertisement
3/9
बाटली न धुण्याचे गंभीर परिणामतज्ज्ञांच्या मते, जर पाण्याची बाटली नियमित स्वच्छ केली नाही, तर तिच्या आत सूक्ष्म जीव आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. हे बॅक्टेरिया केवळ पाण्याचे चव बदलत नाहीत, तर पोटदुखी, इन्फेक्शन आणि पचनाच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. शक्य असल्यास बाटली रोज धुवावी, अन्यथा किमान दर दोन-तीन दिवसांतून एकदा ती व्यवस्थित साफ करणे अनिवार्य आहे.
advertisement
4/9
स्वच्छतेची योग्य पद्धत: केवळ पाणी फिरवून चालणार नाहीअनेकजण बाटलीत थोडे पाणी टाकून ती हलवतात आणि स्वच्छ झाली असे समजतात. पण हे पुरेसे नाही.बाटलीचा बाहेरील भाग कोमट पाणी, स्पंज आणि लिक्विड सोपच्या मदतीने घासून पुसावा, जेणेकरून तळावरील धूळ आणि माती निघून जाईल.
advertisement
5/9
बाटलीच्या आत आपले हात पोहोचू शकत नाहीत, तिथे साचलेली घाण काढण्यासाठी बॉटल ब्रशचा वापर करा. यामुळे तळाला आणि कोपऱ्यांत जमा झालेली चिकट घाण पूर्णपणे निघून जाते.
advertisement
6/9
टोपण आणि कडा (Cap & Rim): बॅक्टेरिया सर्वात जास्त बाटलीच्या टोपण आणि वरच्या कडेवर जमा होतात. हे भाग स्पंजने चोळून स्वच्छ करा. स्वच्छ धुवून झाल्यावर बाटली उन्हात पूर्ण वाळू द्या, जेणेकरून ओलाव्यामुळे बुरशी (Mold) लागणार नाही.
advertisement
7/9
बाटलीतील दुर्गंधी घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपायकधीकधी बाटलीला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. अशा वेळी साध्या पाण्याने तो जात नाही. यासाठी खालील ट्रिक वापरा:1. बाटलीत एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडे लिंबाचे पाणी टाका.2. त्यात कोमट पाणी भरून 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा.3. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बाटलीतील दुर्गंधी आणि बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होतील.
advertisement
8/9
प्रवासासाठी 'स्मार्ट' टिप्सजे लोक सतत प्रवासात असतात, त्यांनी आपल्या बॅगेत लहान 'बॉटल फ्रेशनर' ठेवावे. तसेच, सध्या बाजारात 'बॉटल क्लिनिंग टॅब्लेट्स' (Cleaning Tablets) उपलब्ध आहेत. ही गोळी बाटलीतील पाण्यात विरघळली की काही मिनिटांतच बाटली आतून चमकू लागते आणि निर्जंतुक होते.
advertisement
9/9
पाण्याची बाटली ही केवळ तहान भागवण्याचे साधन नाही, तर ती तुमच्या जीवनशैलीचा भाग आहे. बाटलीची स्वच्छता ही केवळ सवय नसून ते आरोग्याचे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे आजच तुमची बाटली तपासा आणि तिला स्वच्छ करूनच पुढचा घोट घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : पाण्याची बाटली धुतली तरी वास जात नाही? हे सोपे उपाय करून पाहा, दुर्गंध होईल गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल