TRENDING:

Guava : पेरू खाताना साल काढून खायची की सालीसोबत? तज्ज्ञ काय सांगतात वाचा

Last Updated:
आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ दीपशिखा यांनी पेरू खाण्याच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकला आहे. जर तुम्हीही पेरू प्रेमी असाल, तर हे काही महत्त्वाचे बदल तुमच्या आरोग्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतात.
advertisement
1/8
Guava : पेरू खाताना साल काढून खायची की सालीसोबत? तज्ज्ञ काय सांगतात वाचा
लहानपणी शाळेबाहेर मिळणारा मीठ-मसाला लावलेला पेरू असो किंवा हिवाळ्याच्या दिवसात घरोघरी येणारा गोड पेरू... या फळाची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालते. पेरू केवळ चवीलाच चविष्ट नसून तो 'आरोग्याचा खजिना' मानला जातो. पण, आपल्यापैकी अनेकजण पेरू खाताना तो सोलून खातात, तर काहीजण सालीसोबत खाणे पसंत करतात. पण तुम्हाला माहितीय का की पेरु खाण्याटी नेमकी योग्य पद्धत कोणती? आणि पांढरा पेरू की लाल पेरू, आरोग्यासाठी कोणता जास्त फायदेशीर?
advertisement
2/8
आरोग्य आणि पोषण तज्ज्ञ दीपशिखा यांनी पेरू खाण्याच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकला आहे. जर तुम्हीही पेरू प्रेमी असाल, तर हे काही महत्त्वाचे बदल तुमच्या आरोग्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतात.
advertisement
3/8
सालीसोबत पेरू खाण्याचे फायदेअनेकांना पेरूची साल काढून खाण्याची सवय असते, मात्र तज्ज्ञांच्या मते साल न काढता पेरू खाणे अधिक फायदेशीर आहे. पेरूच्या सालीमध्ये पोटॅशियम, झिंक आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जेव्हा आपण साल काढून टाकतो, तेव्हा आपण या महत्त्वाच्या पोषक तत्वांना मुकतो.
advertisement
4/8
पेरूमध्ये पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे हृदयाचे रक्षण करतात आणि शरीरातील सूज (Inflammation) कमी करण्यास मदत करतात. मधुमेही आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी खास सल्लाजर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह (Diabetes) किंवा हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, तर तुमच्यासाठी पेरू खाण्याची पद्धत खूप महत्त्वाची ठरते.
advertisement
5/8
दीपशिखा यांच्या मते, अशा रुग्णांनी पेरू सालीसोबतच खावा. काही अभ्यासांनुसार, सालीसह पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास अधिक मदत होते. तसेच, पेरूमध्ये असलेल्या फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही चालना मिळते.
advertisement
6/8
वयोवृद्धांसाठी पेरू का आहे महत्त्वाचा?तरुणांच्या तुलनेत वयोवृद्धांनी पेरूचे सेवन अधिक करणे गरजेचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेरूमध्ये असलेले प्रथिने (Protein) आणि अँटीऑक्सिडंट्स. वयोवृद्धांना पेरूमुळे पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही अचानक वाढत नाही.
advertisement
7/8
पेरू हे व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के चा उत्तम स्रोत आहे. ते खाण्यापूर्वी तुमची शारीरिक स्थिती लक्षात घ्या. जर तुम्ही मधुमेही असाल तर पांढरा आणि सालीसह पेरू खा, आणि जर घरातील लहान मुले किंवा वृद्धांना द्यायचा असेल तर मऊ लाल पेरू निवडा. निसर्गाचे हे देणं योग्य पद्धतीने खाल्ले, तर दवाखान्याची पायरी चढण्याची गरज भासणार नाही
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Guava : पेरू खाताना साल काढून खायची की सालीसोबत? तज्ज्ञ काय सांगतात वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल