TRENDING:

Saleh Mohammadi : कोण आहे इराणचा 19 वर्षांचा चॅम्पियन कुस्तीपटू? ज्याला भर चौकात दिली गेली फाशीची शिक्षा!

Last Updated:

Who is Saleh Mohammadi Capital Punishment : सालेह मोहम्मदी, मेहदी घासेमी आणि सईद दाव्वुदी अशी फाशी देण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. जानेवारी महिन्यात खामेनी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या यादीत या तिघांचा समावेश होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Saleh Mohammadi Iran Wrestling Champion : एकेकडे अमेरिकेचे हल्ले सुरू असताना इराणच्या अंतर्गत घडोमोडींना वेग आला आहे. इराणवर कुणाचंही नियंत्रण नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. इराणमधील कोम शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इराणच्या 19 वर्षीय चॅम्पियन कुस्तीपटूसह दोघांना सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात आली आहे. या कारवाईमुळे जगभरातून संतापाची लाट उसळली असून क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
Who is Saleh Mohammadi Capital Punishment
Who is Saleh Mohammadi Capital Punishment
advertisement

खामेनी सरकारच्या विरोधात आंदोलन

सालेह मोहम्मदी, मेहदी घासेमी आणि सईद दाव्वुदी अशी फाशी देण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. जानेवारी महिन्यात खामेनी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या यादीत या तिघांचा समावेश होता. तेहरानच्या दक्षिणेस सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'कोम' शहरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्यानंतर या तिघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तिघांना बराच त्रास देण्यात आल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे.

advertisement

कोण होता सालेह मोहम्मदी?

वयाच्या 19 व्या वर्षाच्या आधीच सालेह मोहम्मदी याने देशासाठी आंतरराष्ट्रीय कांस्यपदक जिंकलं होतं. 19 वर्षीय सालेह मोहम्मदी हा एक युवा इराणी कुस्तीपटू होता, ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्याने रशियातील क्रास्नोयार्स्क येथे झालेल्या 2024 सैतिएव कप फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकही जिंकलं होतं. तसेच आगामी ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं.

advertisement

अनेक नामवंत खेळाडू तुरूंगात

अनेक नामवंत खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच सध्या इराणमध्ये तुरुंगात आहेत. यामध्ये मोहम्मद होसेन होसेनी आणि अमीर रझा नसर अझादानी या फुटबॉलपटूंचा देखील समावेश आहे. तसेच आशियाई युवा खेळात कांस्यपदक जिंकणाऱ्या मोहम्मद जवाद वफे सानी आणि मोहम्मद महशरी यांना देखील तुरंगाची हवा खावी लागलीये. तसेच वॉटर पोलो, गोलकीपर अली पिशेवरजादेह, मॅरेथॉन धावपटू निलोफर पास आणि बास्केटबॉल प्रशिक्षक पयाम वाहिदी यांना देखील इराणने तुरूंगात टाकलं होतं.

advertisement

इराणची तालिबानी मानसिकता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

दरम्यान, सालेह मोहम्मदी, मेहदी घासेमी आणि सईद दाव्वुदी यांना बराच त्रास देण्यात आला. जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यात आलं. वकिलांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. एवढंच नाही तर बंद दाराआड सुनावणी देखील झाली. याचिका करण्याचा अधिकारही नव्हता, असं समोर आलंय. त्यामुळे आता इराणची तालिबानी मानसिकता समोर आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Saleh Mohammadi : कोण आहे इराणचा 19 वर्षांचा चॅम्पियन कुस्तीपटू? ज्याला भर चौकात दिली गेली फाशीची शिक्षा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल