Akshaya Tritiya 2025: वर्षभर परत काळजीच नाही! अक्षय तृतियेला घरासाठी या गोष्टी खरेदी करून ठेवायच्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीया हा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. नवीन काम सुरू करण्यासाठी आणि काहीतरी नवीन खरेदी करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. अक्षय तृतीयेला आखा तीज असेही म्हणतात. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो. या वर्षी हा सण 30 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. अक्षय तृतियेला जे काही खरेदी केले जाते त्याचे मूल्य आणि महत्त्व कधीही कमी होत नाही आणि त्या गोष्टी जीवनात समृद्धी आणि आनंद आणतात. या दिवशी देवी लक्ष्मी भक्तांवर विशेष आशीर्वाद देते. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषी धर्मेंद्र दीक्षित याबद्दल सांगत आहेत.
advertisement
1/6

सोने - अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. सोनं हा फक्त मौल्यवान धातू नाही तर एक चांगली पारंपारिक गुंतवणूक देखील आहे. अक्षय तृतीयेला खरेदी केलेले सोने नेहमीच वाढते, असे मानले जाते.
advertisement
2/6
वाहन - नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. या दिवशी शुभ मुहूर्तावर गाडी खरेदी केल्याने भविष्यात आनंद आणि यश मिळते.
advertisement
3/6
चांदी - चांदीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी चांदीचे नाणे खरेदी केल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते. चांदी खरेदी केल्यानंतर, तिची पूजा करून जिथे पैसे ठेवता तिथे ठेवावी.
advertisement
4/6
मालमत्ता खरेदी - या दिवशी जमीन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होतेच शिवाय भविष्यात प्रगती आणि सकारात्मकता देखील मिळते.
advertisement
5/6
मातीची घागर (हंडा) -या दिवशी मातीचे भांडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. ते संपत्ती आणि मालमत्तेचे प्रतीक आहे. खरेदी केल्या भांड्याची पूजा करा, त्यात अख्खे तांदूळ आणि हळद घाला आणि वर्षभर घरात ठेवा, यामुळे संपत्ती वाढते.
advertisement
6/6
भांडी - या दिवशी घरासाठी भांडी खरेदी करणं खूप शुभ आहे. विशेषतः पितळ किंवा तांब्याची भांडी खरेदी केल्याने घरात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. शिवाय नवीन कपडे खरेदी केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Akshaya Tritiya 2025: वर्षभर परत काळजीच नाही! अक्षय तृतियेला घरासाठी या गोष्टी खरेदी करून ठेवायच्या