Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाचा पहिला सण..! गुढीपाडवा का आणि कसा साजरा करतात?
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Gudi Padwa 2025 : या वर्षी 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. हा महाराष्ट्रातला एका प्रमुख सण आहे. हा सण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांत साजरा केला जातो.
advertisement
1/7

गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा होतो.
advertisement
2/7
चैत्र हा हिंदू पंचांगातला पहिला महिना आहे. यंदा गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा होत आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातला प्रमुख सण आहे. तो गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात, राजस्थानमधल्या काही भागात साजरा केला जातो.
advertisement
3/7
हा सण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत एकाच दिवशी, पण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. सिंधी समाजात हा सण चेटीचंड नावानं साजरा केला जातो.
advertisement
4/7
भगवान श्री ब्रह्मदेवानं चैत्र शुक्ल प्रतिपदेला विश्वाची निर्मिती केली असं मानलं जातं. त्यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले जाणारे प्रभु श्रीराम रावणाचा पराभव करून आणि याच दिवशी 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते.
advertisement
5/7
गुढीपाडवा हा 17 व्या शतकात मुघलांवर मराठ्यांच्या विजयाचा उत्सव असल्याचं मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या विजयानंतर गुढी उभारली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे, असादेखील विश्वास आहे.
advertisement
6/7
गुढीपाडव्याच्या दिवशी, घरासमोर, टेरेसमध्ये किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारतात. ही गुढी बांबूची असते. त्याला रेशीम किंवा कापडापासून बनवलेलं वस्त्र ध्वजाच्या आकारात नेसवलं जातं. त्यानंतर हार-फुलं, कडुनिंबाच्या पानांनी गुढी सजवली जाते. गुढीच्या वर तांब्या किंवा चांदीचं भांडं ठेवलं जातं. या दिवशी घर स्वच्छ करतात. घराबाहेर दारावर आंब्याची पानं, रांगोळी, फुलं , तोरण लावून सजावट करतात. या दिवशी पुरळपोळी, श्रीखंड आणि मोदकासारखे पारंपारिक पदार्थ बनवले जातात.
advertisement
7/7
या सणाच्या निमित्तानं आप्तस्वकीयांना घरी बोलावलं जातं. तसंच या दिवशी लोक देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिरांमध्ये जातात. तसंच सणाच्या निमित्ताने नवीन वस्त्र, महागड्या वस्तू किंवा सोनं, चांदीचे दागिने खरेदी केले जातात. गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे अनेक जण या दिवशी नवीन कामाला प्रारंभ करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाचा पहिला सण..! गुढीपाडवा का आणि कसा साजरा करतात?