TRENDING:

Marriage Muhurat 2026: नवीन सालातील शुभ विवाह मुहूर्तांची यादी; वर्षभरात कोणत्या महिन्यात किती मुहूर्त

Last Updated:
Marriage Muhurth 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार योग्य मुहूर्तावर लग्न झालं तर वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, समजूतदारपणा, दीर्घायुष्य आणि ईश्वरी कृपा लाभते. योग्य मुहूर्तावर केलेल्या विवाहामुळे पती-पत्नीच्या नात्याला ग्रहांची साथ मिळते आणि आयुष्यातील अडचणी कमी होतात. 2026 साठी ग्रहस्थिती, नक्षत्रांची ताकद, शुक्राची स्थिती आणि पंचांगानुसार महिन्यांनुसार शुभ विवाह मुहूर्त जाणून घेऊ. प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
1/7
नवीन सालातील शुभ विवाह मुहूर्तांची यादी; वर्षभरात कोणत्या महिन्यात किती मुहूर्त
जानेवारी 2026 -जानेवारी महिन्यात एकही शुभ विवाह मुहूर्त नाही. याचं मुख्य कारण म्हणजे शुक्र ग्रह वक्री अवस्थेत असणं आणि काही अशुभ ग्रहयोग. शुक्र हा विवाह, प्रेम आणि सौहार्दाचा कारक ग्रह असल्यामुळे या काळात लग्न टाळलं जातं.
advertisement
2/7
फेब्रुवारी 2026 -फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना मानला जातो आणि 2026 मध्ये या महिन्यात एकूण 12 शुभ विवाह मुहूर्त आहेत. शुभ तारखा: 5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2026. या तारखांमध्ये उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तरा आषाढा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, रोहिणी आणि मृगशीर्ष ही नक्षत्रे येतात, ती विवाहासाठी शुभ मानली जातात.
advertisement
3/7
मार्च 2026 -मार्च महिना ऋतुबदलाचा असून वातावरण आल्हाददायक असतं. 2026 मध्ये या महिन्यात 8 शुभ विवाह तारखा आहेत.शुभ तारखा: 2, 3, 4, 7, 8, 9, 11 आणि 12 मार्च 2026. या काळात मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, स्वाती, अनुराधा आणि मूळ नक्षत्रांचा योग आहे.
advertisement
4/7
एप्रिल 2026 - वसंत ऋतू बहरलेला असताना लग्नासाठी एप्रिल महिना अतिशय सुंदर मानला जातो. शुभ तारखा: 15, 20, 21, 25, 26, 27, 28 आणि 29 एप्रिल 2026. या काळात उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, मृगशीर्ष, मघा, उत्तरा फाल्गुनी आणि हस्त नक्षत्रांचा योग आहे.
advertisement
5/7
मे 2026 - मे महिन्यात एकूण 8 शुभ विवाह मुहूर्त आहेत. शुभ तारखा: 1, 3, 5, 6, 7, 8, 13 आणि 14 मे 2026. स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तरा आषाढा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे विवाहासाठी अनुकूल ठरतात.जून 2026 - जून महिन्यात सूर्यप्रकाश आणि दीर्घ दिवसांमुळे शुभ कार्यांसाठी चांगली ऊर्जा असते. शुभ तारखा: 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 29 जून 2026. या काळात उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा आणि मूळ नक्षत्रांचा योग आहे.
advertisement
6/7
जुलै 2026 - पावसाळ्याच्या सुरुवातीस जुलै महिन्यात मर्यादित पण शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. शुभ तारखा: 1, 6, 7 आणि 11 जुलै 2026. उत्तरा आषाढा, उत्तरा भाद्रपदा आणि रोहिणी नक्षत्रांमध्ये हे मुहूर्त येतात.ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 - या तीन महिन्यांत चातुर्मास असल्यामुळे विवाहासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नाहीत. चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात, त्यामुळे लग्नासारखी शुभ कार्ये टाळली जातात. मात्र हा काळ पूजा, जप, ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत योग्य असतो.
advertisement
7/7
नोव्हेंबर 2026 - चातुर्मास संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा शुभ विवाह मुहूर्त सुरू होतात. शुभ तारखा: 21, 24, 25 आणि 26 नोव्हेंबर 2026. रेवती, रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्रांचा या काळात योग आहे.डिसेंबर 2026 - थंडीचा महिना असून सण-उत्सवांनी भरलेला डिसेंबर लग्नासाठी लोकप्रिय असतो. शुभ तारखा: 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर 2026. उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाती आणि उत्तरा आषाढा नक्षत्रांमध्ये हे विवाह मुहूर्त येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Marriage Muhurat 2026: नवीन सालातील शुभ विवाह मुहूर्तांची यादी; वर्षभरात कोणत्या महिन्यात किती मुहूर्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल