TRENDING:

Guru Nanak Quotes: जीवनाचा अर्थ सापडतो! गुरूनानक यांचे 10 अनमोल विचार कलाटणी देणारे

Last Updated:
Guru Nanak Jayanti 2024, Guru Nanak Quotes in Marathi: यावर्षी गुरुनानक यांची 555 वी जयंती साजरी होत आहे. शिखांचे पहिले गुरू असण्याबरोबरच ते धार्मिक सुधारक, समाजसुधारक, कवी, देशभक्त, तत्त्वज्ञ आणि योगी देखील होते. त्यांनी नेहमीच समाजाला एकत्र आणण्याचा संदेश दिला. जातीवाद नाहीसा करून भेदभाव दूर करून समाजात परस्पर बंधुभाव वाढावा यासाठी त्यांनी अनेक प्रवचनेही दिली.
advertisement
1/5
जीवनाचा अर्थ सापडतो! गुरूनानक यांचे 10 अनमोल विचार कलाटणी देणारे
गुरुनानक यांचे 10 मौल्यवान विचार -क्रमांक 1 - देव एक आहे आणि तो सर्वत्र उपस्थित आहे.क्रमांक 2 - माणसाने नियमित देवाची उपासना केली पाहिजे.
advertisement
2/5
क्रमांक 3 - आपण नेहमी आनंदी असले पाहिजे आणि आपल्या चुकांसाठी देवाची क्षमा मागितली पाहिजे.क्रमांक 4 - समाजातील सर्व लोकांना समान दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, स्त्री-पुरुष असा भेदभाव होता कामा नये.
advertisement
3/5
क्रमांक 5 - जर तुम्हाला जग जिंकण्याची इच्छा असेल तर प्रथम तुम्ही स्वतःच्या वाईट सवयींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.क्रमांक 6 - आपण कधीही इतर कोणत्याही व्यक्तीचे हक्क-अधिकार मारता कामा नये.
advertisement
4/5
क्रमांक 7 - आपल्या मेहनतीचा आणि प्रामाणिक कमाईचा काही भाग गरीब आणि गरजूंना दान करावा.क्रमांक 8 - पैसा नेहमी आपल्या खिशात असायला हवा. पैशांची हवस असू नये, पैसा डोक्यात जाऊ देऊ नये.
advertisement
5/5
क्रमांक 9 - आपण स्वतःमध्ये कधीही अहंकार वाढवू नये, नेहमी नम्रतेने जीवन जगावे.क्रमांक 10 - आपण सर्व लोकांवर प्रेम केले पाहिजे आणि समाजात नेहमी एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Guru Nanak Quotes: जीवनाचा अर्थ सापडतो! गुरूनानक यांचे 10 अनमोल विचार कलाटणी देणारे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल