TRENDING:

श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:
नागपंचमीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, सापाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये असतात. याबाबत सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी माहिती दिलीय.
advertisement
1/7
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वा
संपूर्ण महाराष्ट्रात <a href="https://news18marathi.com/tag/nagpanchami/">नागपंचमी</a> हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागदेवता ही हिंदू धर्मात पूज्यनीय मानली जाते. त्यामुळे नागपंचमीला महिला वर्ग भाऊ म्हणून नागाची पूजा करतात. प्रत्येक भागात याबाबत विविध प्रथा परंपरा आहेत. तसेच समज गैरसमजही आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी माहिती दिलीय.
advertisement
2/7
काही ठिकाणी नागाच्या प्रतिकात्मक चित्राची पूजा केली जाते. तसेच वारुळावर जाऊन दूध, लाह्या हळदी-कुंकू वाहिले जाते. परंतु, या दिवशी कुणीही नाग, सापाचा खेळ केला किंवा त्यावर पैसे कमाविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी वन विभागाची पथके तैनात आहेत.
advertisement
3/7
साप हा सस्तन प्राणी नाही. दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांचे नाही. त्यामुळे साप दूध पित नाही. तसा प्रयत्न कुणीही करून नये. तसेच हळदी-कुंक हे सापाच्या शरीरासाठी अपायकारक असून, त्वचा खराब होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे सर्पमित्र सांगतात.
advertisement
4/7
सापाबद्दल काही अंधश्रद्धाही आहेत. यामध्ये नागाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात, साप धनाचे रक्षण करतो, साप पाठलाग करतो, साप पुंगीवर नाचतो, साप दूध पितो, असे गैरसमज लोकांमध्ये आहेत. तसेच विशिष्ट प्रकारच्या सापांमुळे धनलाभ होतो, अशी चुकीची समजूत आहे.
advertisement
5/7
साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. साप बदला घेत नाही. याबाबत लोकांच्या मनात अंधश्रद्धा आणि गैरसमज असल्याचंही सर्पमित्र सांगतात.
advertisement
6/7
साप हा शेतकयांचा खरा मित्र मानला जातो. तो खऱ्या अर्थाने उपद्रवी असलेल्या उंदरासारख्या प्राण्यांचा नायनाट करतो . पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नागपंचमीला शेतात नांगरदेखील चालवित नाहीत.
advertisement
7/7
नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यास मदत होत आहे, असेही सर्पमित्र गायकवाड यांनी सांगितले. (अपूर्वा तळणीकर)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल