
पुणे: येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या प्रेमाची खुलेपणाने कबुली देतात. तसेच, या दिवशी अनेकजण आपल्या प्रियकर किंवा प्रियसीसाठी भेटवस्तू आणि विशेषतः गुलाबाचे फूल देतात. या काळात गुलाबाच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.