कृष्णा नदीतील खडकावर उभंय ऐतिहासिक शिवमंदिर, दर्शनासाठी जाताना अनोखी प्रथा
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
अठराव्या शतकातील पेशव्यांचे सरदार नारो अप्पाजी खिरे यांनी पुण्यातील तुळशीबाग आणि राम मंदिर उभारलं. त्याचपद्धतीची लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराचीही उभारणी आहे.
advertisement
1/7

आपली भारतभूमी विविध प्राचीन देवस्थानांनी परिपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्यालाही असंख्य देवस्थानांचा प्राचीन वारसा लाभलाय. <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">सातारा जिल्ह्यातील</a> लिंब गावात वसलेलं कोटेश्वर महादेव मंदिर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. परंतु या मंदिरातील प्रथेबाबत कदाचित आपल्याला पूर्ण माहिती नसू शकते.
advertisement
2/7
12 मोटरच्या विहिरीमुळे प्रसिद्ध असलेल्या लिंब-शेरी गावांना कृष्णा नदी पात्रातील खडकावर वसलेल्या श्री कोटेश्वर महादेव मंदिरामुळे विशेष ओळखलं जातं.
advertisement
3/7
अठराव्या शतकातील पेशव्यांचे सरदार नारो अप्पाजी खिरे यांनी पुण्यातील तुळशीबाग आणि राम मंदिर उभारलं, त्याचपद्धतीची या मंदिराचीही उभारणी आहे.
advertisement
4/7
कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या खडकांमुळे नदीपात्र दोन भागांत विभागलंय. पावसाळ्यात नदीला पूर आला की, संपूर्ण मंदिराभोवती जो पाण्याचा वेढा निर्माण होतो तो पाहण्याचा अनुभव चित्त थरारक असतो. इतरवेळी नदीवर बांधलेल्या पुलावरून थेट मंदिरापर्यंत जाता येतं.
advertisement
5/7
कोटेश्वर मंदिरात दर्शन घ्यायचं असेल तर कृष्णा नदीत स्नान करून जावं लागतं. मिळालेल्या माहितीनुसार, अगदी कंबरेचा पट्टा किंवा पाकिटही मंदिरात घेऊन जाण्यास मनाई आहे. या मंदिरात महादेवांचं दर्शन घेण्यासाठी निर्वस्त्रदेखील जाता येतं. महिलांनी ओल्या कपड्यांनी दर्शन घेतलं तरी चालतं.
advertisement
6/7
सुरूवातीला एक लहानसं बाप्पाचं मंदिर आहे. त्याच्यापुढे मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाला पार आहे. या पाराच्या खालच्या बाजूला देवळीत अनेक देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. प्रवेशद्वारासमोर उभं राहिल्यावर उजव्या हाताला नदीच्या पात्रापासून वरपर्यंत दगडी तट बांधलाय.
advertisement
7/7
मंदिराच्या देवळीत बाप्पाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. कोटेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूने कृष्णा नदी वाहते. मंदिरासमोर कुंड आहे. या कुंडावर एका लहानश्या शिवलिंगाचं दर्शन घडतं. एवढी सुरेख या मंदिराची रचना आहे. हे मंदिर पाहण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक साताऱ्यात दाखल होतात.(शुभम बोडके, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
कृष्णा नदीतील खडकावर उभंय ऐतिहासिक शिवमंदिर, दर्शनासाठी जाताना अनोखी प्रथा