हर हर महादेव! श्रावण महिन्यात पुण्यातील 5 शिवमंदिरांना द्या भेट, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पुणे शहरामध्ये अनेक धाटणीची मंदिरे आहेत. श्रावणात तुम्ही पुण्यातील या मंदिरांना भेटी देऊ शकता.
advertisement
1/5

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशामुळे भाविक आणि पर्यटकांच्या हृदयात एक प्रमुख स्थान आहे. शहरामध्ये अनेक धाटणीची मंदिरे आहेत. श्रावणात तुम्ही पुण्यातील या मंदिरांना भेटी देऊ शकता.
advertisement
2/5
बनेश्वर मंदिर बाणेर : पुण्यातील बाणेर या उपनगरात वसलेले हे एक शतकानुशतके जुने गुहा मंदिर आहे. हिंदू महाकाव्य महाभारताचे मध्यवर्ती पात्र असलेले पाच महान बंधू, पांडवांचे लपण्याचे ठिकाण म्हणून ही गुहा लोककथांमध्ये नोंदवली गेली आहे. गुहेत एक शिवलिंग आहे जे सुमारे 700 ते 800 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. याठिकाणी तुम्ही दर्शनास जाऊ शकता.
advertisement
3/5
घोरडेश्वर लेणी : घोरडेश्वर लेणी किंवा शेलारवाडी लेणी ही पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या NH4 महामार्गाजवळील तळेगाव येथे आहे. गुहेच्या आत फार जुनं शिवलिंग आहे. घोराडेश्वर मंदिरात पोहोचण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करावी लागेल.डोंगरावर वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यातील हे मंदिर डोळ्यांची पारणं फेडणारं असं आहे.
advertisement
4/5
धणेश्वर मंदिर : पुणे जिल्ह्यातल्या चिंचवड गावातील श्री क्षेत्र धनेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन शिवालय आहे. हे मंदिर दक्षिण वाहिनी पवना नदीच्या काठावर वसलेले आहे. हेमाडपंथी बांधणीच हे मंदिर असून पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभलेला आहे. संजीवन समाधीचा पावन सहवास महासाधू मोरया गोसावी यांनी याच मंदिरात ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली होती.
advertisement
5/5
वृद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर : श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर असे या प्राचीन शिवमंदिराचे नाव आहे. हे पु्ण्यातील 700 वर्ष जूने प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. मंदिराला भव्य द्वार असून उंच कळस आहे. मंदिराचे सभामंडप अतिशय आकर्षक असून तुम्हाला काळा रंगाचा नंदी दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
हर हर महादेव! श्रावण महिन्यात पुण्यातील 5 शिवमंदिरांना द्या भेट, PHOTOS