TRENDING:

सावधान! महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' महिलांनी चुकूनही करू नका उपवास, अन्यथा सोसावे लागतील हाल

Last Updated:
महाशिवरात्रीचा उपवास हा भगवान शंकराच्या प्रती असलेली भक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी अनेक महिला निर्जळी किंवा कडक उपवास करण्याची तयारी करत आहेत.
advertisement
1/7
महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' महिलांनी चुकूनही करू नका उपवास, सोसावे लागतील हाल
महाशिवरात्रीचा उपवास हा भगवान शंकराच्या प्रती असलेली भक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी अनेक महिला निर्जळी किंवा कडक उपवास करण्याची तयारी करत आहेत. मात्र, शास्त्र आणि आयुर्वेद सांगते की, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये महिलांनी उपवास करणे टाळावे किंवा अत्यंत सावधगिरी बाळगावी. श्रद्धेपेक्षाही जीव श्रेष्ठ आहे, हा विचार करून काही महिलांनी उपवासाचा हट्ट धरू नये.
advertisement
2/7
गर्भवती महिला: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी आईला सतत पोषणाची गरज असते. प्रदीर्घ काळ उपाशी राहिल्याने रक्तातील साखर कमी होऊन चक्कर येणे किंवा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असतो. अशा महिलांनी कडक उपवास करू नये.
advertisement
3/7
स्तनपान देणाऱ्या माता: ज्या महिला लहान बाळांना अंगावर दूध पाजतात, त्यांनी उपवास टाळलेला बरा. अन्नाच्या कमतरतेमुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे बाळाची भूक अपूर्ण राहू शकते.
advertisement
4/7
मासिक पाळी सुरू असलेल्या महिला: मासिक पाळीच्या काळात शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो, ज्यामुळे अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी उपवास केल्याने पोटदुखी, कंबरदुखी आणि थकवा वाढू शकतो. शास्त्रात या काळात केवळ मानसिक जप करण्यास सांगितले आहे.
advertisement
5/7
मधुमेह असलेल्या महिला: ज्या महिलांना शुगर किंवा मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी चुकूनही कडक उपवास करू नये. जास्त वेळ उपाशी राहिल्याने 'हायपोग्लायसेमिया' होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
6/7
अशक्तपणा किंवा ॲनिमिया असलेल्या महिला: ज्या महिलांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे, त्यांना उपवासामुळे तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते. अशा महिलांनी फलाहार करून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा.
advertisement
7/7
औषधोपचार सुरू असलेल्या महिला: जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजारावर नियमित औषधे घेत असाल, तर रिकाम्या पोटी औषधे घेणे हानिकारक ठरू शकते. औषधांचा डोस चुकवणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे अशा वेळी उपवास करू नये. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सावधान! महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' महिलांनी चुकूनही करू नका उपवास, अन्यथा सोसावे लागतील हाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल