TRENDING:

हमाल दे धमाल! रेल्वे स्टेशनवर ओझी उचलतोय फेमस बॉडी बिल्डर, कामगिरी पाहाल तर चकीत व्हाल!

Last Updated:
Inspiring Story: अमरावतीतील एका हमाल तरुणानं बॉडी बिल्डिंगमध्ये मोठं नाव कमावलंय. रेल्वे स्टेशनवर हमाली करतानाच रोशन हे जिममध्ये देखील घाम गाळतात.
advertisement
1/7
हमाल दे धमाल! रेल्वे स्टेशनवर ओझी उचलतोय फेमस बॉडी बिल्डर, कामगिरी पाहाल तर..
जिद्द आणि चिकाटीने मेहनत घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते. अमरावतीतील वरोडा येथील एका हमाली काम करणाऱ्या तरुणाने हेच खरं करून दाखवलंय. रोशन भजनकर असे या तरुणाने नाव असून त्याने हमाली काम सांभाळत बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. महाराष्ट्रातील बॉडी बिल्डिंग क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाची चर्चा आहे.
advertisement
2/7
अमरावतीमधील वरोडा गावातील रोशन भजनकर या तरुणाने हमाली काम सांभाळून आपली बॉडी बनवली आहे. गेल्या 14 ते 15 वर्षापासून रोशन हमाली काम करत आहेत. त्याचबरोबर गेल्या 7 वर्षापासून त्यांनी बॉडी बिल्डिंग सुरू केली आणि अनेक स्पर्धा जिंकल्या. या काळात माझी फॅमिली आणि मित्र परिवार माझ्या पाठीशी राहिल्याचं रोशन सांगतात.
advertisement
3/7
“बॉडी बिल्डिंग हे काही माझं स्वप्न नव्हतं. माझे दादा जेव्हा जिममध्ये जात होते. तेव्हा मी त्यांच्यासोबत जात होतो. तेव्हा वाटायचं की, आपण 18 वर्षाच्या वर झालो की, आपण पण असंच जिमला जाऊ. त्यानंतर काही दिवसांनी मी जिम सुरू केले. त्यानंतर मी बडनेरा रेल्वे स्टेशनला हमाली काम सुरू केले,” असं रोशन यांनी सांगितलं.
advertisement
4/7
रोशन पुढं सांगतात की, “दादा सोबत जिमला जायला सुरुवात केली. तेव्हा त्याठिकाणी माझे अनेक मित्र तयार झाले. त्यांच्या सपोर्टमुळे मी बॉडी बनवण्याच्या नादी लागलो. थोड्या दिवसांत माझी बॉडी थोडी व्यवस्थित झाल्यानंतर माझ्या मित्रांनी मला एका स्पर्धेत सहभागी होण्यास भाग पाडले. पण त्या स्पर्धेत मी टिकू शकलो नाही.”
advertisement
5/7
स्पर्धेतील पराभवाना मी खूप निराश झालो होतो. असं वाटत होतं आपण यात खूप मागे आहोत. पुढे जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. तेव्हापासून मी 1 महिना फक्त सॅलड घेत होतो आणि वर्क आऊट करत होतो. त्यानंतर पुन्हा बडनेरा येथे स्पर्धा होती. त्याठिकाणी मी पहिला आलो. तेव्हा माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.
advertisement
6/7
अपयशामुळे कळले की, उपाशी राहून बॉडी बनत नसते. माझे कोच सुद्धा मला त्याठिकाणी मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझे डाएट प्लॅन, वर्कआऊट करत आहे. तेव्हापासून माझ्यात खूप बदल झालेत. मला पुढेही यात करिअर करायचं आहे. त्यामुळे माझे काम आणि वर्कआऊट हे दोन्ही मी सांभाळत आहे, असं रोशन यांनी सांगितलं.
advertisement
7/7
रोशन सांगतात की, मी सकाळी 4 वाजता उठून कामाला जातो. उन्हाळ्यात आम्हाला काम जास्त असते. मी माझा नाश्ता सोबत ठेवतो. ओट्स, अंडी असा सकाळचा नाश्ता घेतो. त्यानंतर दुपारच्या जेवणात चिकन, राईस, सॅलड असा आहार असतो. सायंकाळच्या वेळी काही वेळा केळी तर काही वेळा ओट्स, अंडी असा नाश्ता असतो. त्यानंतर जिम आणि रात्रीचे जेवण असा डाएट प्लॅन असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
हमाल दे धमाल! रेल्वे स्टेशनवर ओझी उचलतोय फेमस बॉडी बिल्डर, कामगिरी पाहाल तर चकीत व्हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल