TRENDING:

Monthly Numerology: जानेवारी महिना कोणासाठी कसा? मूलांक 1 ते 9 मासिक अंकशास्त्र; आनंदवार्ता कोणाला?

Last Updated:
Monthly Numerology: जानेवारी महिना ग्रह-नक्षत्रांच्या बाबतीत खास असणार आहे. जानेवारी महिना अंकशास्त्रानुसार कसा असेल जाणून घेऊ, मूलांक 1 ते 9 सगळ्या मूलांकाचे मासिक अंकशास्त्र जाणून घेऊ. कोणत्या मूलांकाला पहिल्या महिन्यात काय मिळेल पाहुया.
advertisement
1/9
जानेवारी महिना कोणासाठी कसा? मूलांक 1 ते 9 मासिक अंकशास्त्र; आनंदवार्ता कोणाला?
क्रमांक 1 (ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे)जानेवारी महिना नातेसंबंधांच्या बाबतीत उत्साह आणि नव्या ऊर्जेने भरलेला असेल. जे आधीच रिलेशनमध्ये आहेत त्यांच्यात पुन्हा आपुलकी आणि समज वाढेल. अविवाहित लोकांना अर्थपूर्ण ओळखी होण्याची शक्यता आहे. संवाद मोकळा ठेवल्यास आणि एकमेकांचं ऐकून घेतल्यास छोटे वाद सहज मिटतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहा. गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा आणि बजेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. हा महिना नात्यांमध्ये पुढचा टप्पा ठरवण्यासाठी योग्य आहे, जसं की एकत्र राहण्याचा किंवा भविष्याची योजना करण्याचा विचार. करिअरमध्ये प्रगती, मान-सन्मान आणि उत्पन्न वाढीच्या संधी मिळू शकतात. नवे प्रोजेक्ट घ्या आणि तुमची गुणवत्ता दाखवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, शरीर काय सांगतंय याकडे लक्ष द्या आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
2/9
क्रमांक 2 (ज्यांचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)जानेवारीमध्ये आर्थिक शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणुकीचा विचार नीट करा. विविध ठिकाणी गुंतवणूक करून भविष्यासाठी सुरक्षितता तयार करता येईल. उगाचच आशांवर पैसे खर्च करू नका. प्रेमाच्या बाबतीत संवाद वाढेल आणि समजूतदारपणा नातं मजबूत करेल. जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा. अविवाहित लोकांना आकर्षक आणि आशादायक ओळखी होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीची दारं उघडतील. पुढाकार घ्या आणि नेतृत्वगुण दाखवा. आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या, ताण कमी ठेवा आणि सगळ्यांसाठी स्वतःला झिजवू नका.
advertisement
3/9
क्रमांक 3 (ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे)या महिन्यात आर्थिक बाबतीत शिस्त आणि नियोजन गरजेचं आहे. बचत वाढवा आणि नव्या संधींसाठी खुले राहा. कामात मेहनत, लवचिकता आणि चांगला संवाद फायदेशीर ठरेल. नात्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी एखादी छोटी सहल किंवा खास वेळ काढा. अविवाहित लोकांना नवीन ओळखी आकर्षित करतील. करिअरमध्ये विशेषतः तांत्रिक किंवा वैज्ञानिक क्षेत्रात संधी मिळू शकतात. नवे कौशल्य शिकणं, प्रशिक्षण घेणं फायदेशीर ठरेल. कल्पकता दाखवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नेटवर्किंगमुळे व्यवसाय वाढू शकतो. आरोग्यासाठी नवे व्यायामप्रकार आजमावा आणि सकस आहार घ्या.
advertisement
4/9
क्रमांक 4 (ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे)हळूहळू आर्थिक स्थिरता येईल आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मात्र काही जुन्या बांधिलकी किंवा सवयींमुळे अडचणी येऊ शकतात. व्यवहारिक निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीत योग्य जीवनशैलीमुळे ऊर्जा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत अविवाहित लोकांना नवीन ओळखी होऊ शकतात, पण आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. काही खर्च किंवा गुंतवणूक अपेक्षित फायदा देणार नाही, त्यामुळे योजना बदलण्याची गरज भासेल. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 
advertisement
5/9
क्रमांक 5 (ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे)या महिन्यात उत्पन्न वाढीच्या आणि नव्या संधी मिळण्याच्या शक्यता आहेत. कल्पकता आणि उद्योजक वृत्तीला चालना मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. करिअरमध्ये तुमचं आकर्षण आणि कौशल्य चमकतील. सहकार्य आणि टीमवर्क गरजेचं आहे. अविवाहित लोकांना रोमांचक प्रेमसंधी मिळू शकतात. नव्या उत्पन्नाच्या मार्गांचा किंवा गुंतवणुकीचा विचार करा. आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे. आराम आणि लक्झरीकडे ओढ असली तरी जीवनशैली व्यावहारिक ठेवा.
advertisement
6/9
क्रमांक 6 (ज्यांचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे)अविवाहित असलेल्या मूलांक 6 च्या लोकांना प्रामाणिक आणि मनासारखा जोडीदार सापडू शकतो. आर्थिकदृष्ट्या प्रगती आणि संधी मिळतील. नवी गुंतवणूक किंवा आर्थिक सल्ला फायदेशीर ठरू शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमाच्या बाबतीत मनमोकळ्या गप्पा आणि भावना व्यक्त करण्यासाठी हा चांगला काळ आहे. काही मतभेद किंवा अपेक्षांमुळे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संतुलित निर्णय घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा मेडिटेशनचा उपयोग करा.
advertisement
7/9
क्रमांक 7 (ज्यांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे)या महिन्यात नात्यांमध्ये जवळीक वाढेल. एकत्र घालवलेला वेळ रिलेशन छान करेल. अविवाहित लोकांच्या व्यक्तिमत्त्वाकडे लोक आपोआप आकर्षित होतील. आर्थिकदृष्ट्या नव्या उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत काम केल्यास यश मिळेल, पण निर्णयात उशीर टाळा. आरोग्य स्थिती समजून घ्या आणि ताण कमी करण्यासाठी ध्यान, श्वसनाचे व्यायाम करा.
advertisement
8/9
क्रमांक 8 (ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे)मूलांक 8 च्या अविवाहित लोकांना समान विचारांच्या लोकांशी ओळख होईल. आर्थिक बाबतीत मध्यम पण स्थिर वाढ दिसेल. प्रवास किंवा नवीन अनुभवांमधून लाभ होऊ शकतो. खर्च करताना सावध राहा. नात्यांमध्ये एकत्र शिकणं आणि नवीन कल्पना शेअर करणं नातं मजबूत करेल. करिअरमध्ये नव्या कल्पनांचा वापर करा. आरोग्यासाठी ताण कमी करणाऱ्या सवयी लावून घ्याव्या लागतील.
advertisement
9/9
क्रमांक 9 (ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे)जानेवारीमध्ये आर्थिक वाढीच्या चांगल्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल, पण उगाच खर्च टाळा. साहसी वृत्तीमुळे नवे अनुभव मिळतील. नात्यांमध्ये उत्स्फूर्तपणा ठेवल्यास प्रेम टिकून राहील. अविवाहित लोकांना त्यांच्या विचारांचे जोडीदार मिळू शकतात. भागीदारीतून भविष्यात फायदा होईल. काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल ठेवा. मानसिक आरोग्यासाठी ध्यान, शांतता आणि गरज असल्यास मदत घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Monthly Numerology: जानेवारी महिना कोणासाठी कसा? मूलांक 1 ते 9 मासिक अंकशास्त्र; आनंदवार्ता कोणाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल