Smriti Mandhana : पोरगी काहीच सोडणार नाही! स्मृती मानधनाच्या निशाण्यावर शुभमन गिलचा हा मोठा रेकॉर्ड, फक्त 62 धावांची गरज
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana Set to Break Shubman Gill record : स्मृती मंधानाने 2025 या कॅलेंडर इयरमध्ये आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये 1703 रन्स केले आहेत. कोणत्याही महिला क्रिकेटपटूने एका वर्षात केलेले हे सर्वाधिक रन्स आहेत.
advertisement
1/6

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 5 टी-ट्वेंटी मॅचेसच्या सीरिजमधील अखेरचा सामना आज, 30 डिसेंबर रोजी रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वुमेन्स क्रिकेटसाठी 2025 मधील ही शेवटची मॅच असणार असेल.
advertisement
2/6
या मॅचमध्ये टीम इंडिया श्रीलंकेला 5-0 ने व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, या मॅचमध्ये सर्वांच्या नजरा टीम इंडियाची स्टार बॅटर स्मृती मंधाना हिच्यावर असतील, कारण ती एका खास विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे.
advertisement
3/6
स्मृती मंधानाने 2025 या कॅलेंडर इयरमध्ये आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये 1703 रन्स केले आहेत. कोणत्याही महिला क्रिकेटपटूने एका वर्षात केलेले हे सर्वाधिक रन्स आहेत.
advertisement
4/6
मात्र, आता स्मृतीला पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. सध्या हे स्थान टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्याकडे आहे. शुभमनने या वर्षात 1764 रन्स केले असून स्मृतीला त्याला मागे टाकण्यासाठी आज 62 रन्सची गरज आहे.
advertisement
5/6
स्मृती मंधानासाठी हे वर्ष अत्यंत स्वप्नवत राहिले आहे. तिने 23 वनडे मॅचेसमध्ये 1362 रन्स केले असून त्यात 5 शतकांचा समावेश आहे. भारतीय महिला टीमला पहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
6/6
तसेच 9 टी-ट्वेंटी मॅचेसमध्ये तिने 341 रन्स केले आहेत. आजच्या मॅचमध्ये तिने ही 62 रन्सची खेळी केली, तर ती 2025 मध्ये जगभरात सर्वाधिक रन्स करणारी क्रिकेटपटू ठरेल. त्यामुळे आता शुभमनचा रेकॉर्ड धोक्यात आलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : पोरगी काहीच सोडणार नाही! स्मृती मानधनाच्या निशाण्यावर शुभमन गिलचा हा मोठा रेकॉर्ड, फक्त 62 धावांची गरज