TRENDING:

'सुर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा...', प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप, LIVE कॅमेऱ्यावर सगळं सांगितलं!

Last Updated:
Suryakumar Yadav Khushi Mukherjee : अभिनेत्री खुशी मुखर्जी एमटीव्हीच्या 'स्प्लिट्सव्हिला 10' आणि 'लव्ह स्कूल 3' मध्ये भाग घेतल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
advertisement
1/7
'सुर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा...', प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप
सोशल मीडियावरील आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या एका अभिनेत्रीने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे केले.
advertisement
2/7
यामध्ये टीम इंडियाच्या एका मोठ्या खेळाडूचा उल्लेख केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सूर्यकुमार यादव आहे. तिने सूर्यकुमार यादवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
3/7
अभिनेत्री खुशी मुखर्जीने दावा केला आहे की, भारतीय टी-20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव तिला मेसेज करायचा. "अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे होते, सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता आमच्यात फारशी बातचीत होत नाही," असं खुशीने एका मुलाखतीत म्हटलं आहे.
advertisement
4/7
मला कोणासोबतही नाव जोडले गेलेलं आवडत नाही, असंही तिने यावेळी म्हटलं आहे. या विधानामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या मोठी चर्चा सुरू झाली असून, यावर अद्याप सूर्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
advertisement
5/7
खुशी केवळ या दाव्यामुळेच नाही, तर एका चोरीच्या घटनेमुळेही चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या मित्रांनीच तिला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरातील 25 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा आरोप तिने केला होता.
advertisement
6/7
"जेव्हा मित्रच शत्रू बनतात आणि यशामुळे त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, तेव्हा असे प्रकार घडतात," अशा शब्दांत तिने आपले दुःख व्यक्त केलं होतं. सध्या खुशीच्या या दोन्ही विधानांनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, कोलकाता येथे जन्मलेली खुशी 29 वर्षांची आहे आणि गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा भाग आहे. तिच्या कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये "अंजल थुराई" या तमिळ चित्रपटाने झाली. परंतु तिला खरी ओळख भारतीय टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमधून मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'सुर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा...', प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप, LIVE कॅमेऱ्यावर सगळं सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल