Archana Patkar: 'गेल्या 4 वर्षांपासून माझा मुलगा...', हेमलता पाटकर खंडणी प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hemlata Bane extortion case: अर्चना पाटकर यांची सून आणि अभिनेत्री हेमलता पाटकर हिला १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अर्चना पाटकर यांनी सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली आहे.
advertisement
1/9

मुंबई: सध्या मुंबईत एका धक्कादायक खंडणी प्रकरणानं मोठी खळबळ माजवली आहे. या प्रकरणी 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत 'कांचन आजीं'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांचं नाव सध्या चर्चेत आलं आहे.
advertisement
2/9
अर्चना पाटकर यांची सून आणि अभिनेत्री हेमलता पाटकर हिला १० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर अर्चना पाटकर यांनी सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली आहे.
advertisement
3/9
नोव्हेंबर महिन्यात अंधेरीतील एका आलिशान हॉटेलमध्ये एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचा साखरपुडा सुरू होता. तिथे लेझर लाईट्सच्या वापरावरून हेमलता पाटकर आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी यांचा बिल्डरच्या मुलाशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचं रूपांतर हाणामारीत झालं.
advertisement
4/9
यानंतर हेमलता आणि अमरिना यांनी बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी तब्बल १० कोटी रुपयांची मागणी केली. तडजोड होऊन हा आकडा ५.५ कोटींवर ठरला. पण, मुंबई गुन्हे शाखेने सापळा रचला आणि दीड कोटींचा पहिला हप्ता स्वीकारताना या दोघींना रंगेहाथ पकडलं.
advertisement
5/9
हेमलताला अटक झाल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. त्यानंतर अर्चना पाटकर आणि हेमलता यांचे संबंध असल्याचे समजताच त्यांचं नाव बातम्यांमध्ये येऊ लागलं. यामुळे व्यथित झालेल्या अर्चना यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांचं मत मांडलं.
advertisement
6/9
अर्चना यांनी लिहिलं, "मी गेली ४० वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत."
advertisement
7/9
त्या पुढे म्हणाल्या, "मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा ४ वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा तिच्याशी आता कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका."
advertisement
8/9
अर्चना यांनी मीडियाला कळकळीची विनंती केली आहे की, या गुन्ह्यात त्यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर करून त्यांच्या प्रतिमेला धक्का लावू नये.
advertisement
9/9
हेमलता आणि अमरिना सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघींनी संगनमताने बिल्डरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हे शाखेने अत्यंत चतुराईने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Archana Patkar: 'गेल्या 4 वर्षांपासून माझा मुलगा...', हेमलता पाटकर खंडणी प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली