TRENDING:

MI vs PBKS : 'आम्ही पाच ट्रॉफी जिंकल्यात...', टॉप-2 मधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने रोहितसह 'या' खेळाडूंवर फोडलं खापर!

Last Updated:
Hardik Pandya Statement : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली नाही, ज्यामुळे पलटणला पराभवाचा सामना करावा लागला, असं म्हणत हार्दिक पांड्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
1/7
टॉप-2 मधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने रोहितसह 'या' खेळाडूंवर फोडलं खापर!
आयपीएल 2025 च्या शेवटून दुसऱ्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्सला पंजाबकडून पराभवाची चव चाखावी लागली. अशातच आता कॅप्टन हार्दिक पांड्याने उघड शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
2/7
पंजाब किंग्जविरुद्धच्या 7 विकेट्सने पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्यानंतरच्या नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर हार्दिकने कबूल केलं की, विकेट्सची स्थिती पाहता मुंबईला 20 धावांनी कमी पडल्या.
advertisement
3/7
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली नाही, ज्यामुळे पलटणला पराभवाचा सामना करावा लागला, असं हार्दिक पांड्या म्हणाला. आमची गोलंदाजी क्लिनिकल नव्हती. त्यांनी चांगले शॉट्स खेळले, असंही पांड्या म्हणाला.
advertisement
4/7
आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत, ते नेहमीच कठीण असते. आम्हाला फक्त पुढे चांगले क्रिकेट खेळायचे आहे, असं कॅप्टन हार्दिक पांड्याने म्हटलंय.
advertisement
5/7
आम्हाला सुरुवातीला किंवा मध्यभागी फलंदाजीमध्ये फायदा घेता आला असता, आम्ही त्यावर काम करू, असं म्हणत पांड्याने टॉप ऑर्डरवर खापर फोडलं. गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही तितकं अचूक नव्हतो, असंही पांड्या म्हणाला.
advertisement
6/7
प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिस यांच्या दुसऱ्या विकेटच्या पार्टनशीपचा फायदा त्यांना झाला. आम्ही काहीशी खराब बॉलिंग केली, ज्याचा फायदा पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी घेतला, असंही पांड्या म्हणालाय.
advertisement
7/7
दरम्यान, मुंबईवरील विजयानंतर पंजाब किंग्जचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. यासह, त्याने क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे आणि तो पहिल्या क्रमांकावर राहू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
MI vs PBKS : 'आम्ही पाच ट्रॉफी जिंकल्यात...', टॉप-2 मधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याने रोहितसह 'या' खेळाडूंवर फोडलं खापर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल