IND vs PAK : 22890000000...! भारत पाकिस्तान मॅच रद्द झाली तर कोणाला किती होणार नुकसान? समजून घ्या संपूर्ण गणित
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan T20 World Cup 2026 : विशेष म्हणजे ही मॅच रद्द झाल्यास सुमारे 25 कोटी डॉलर्स म्हणजेच 2289 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे.
advertisement
1/7

बांगलादेशविरुद्धच्या वादानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकारी हस्तक्षेप घेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मोठा वाद निर्माण केला आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्णय कायम ठेवला असला तरी, भारतासोबतची मॅच खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पीसीबीच्या मते, पाकिस्तान सरकारने भारतासोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली नाही.
advertisement
3/7
विशेष म्हणजे ही मॅच रद्द झाल्यास सुमारे 25 कोटी डॉलर्स म्हणजेच 2289 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे.
advertisement
4/7
या मॅचच्या प्रसारणातून ब्रॉडकास्टरला 200 ते 250 कोटी रुपयांच्या जाहिरातींचे उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं. या मॅचसाठी जाहिरातीच्या 10 सेकंदाच्या स्लॉटची किंमत तब्बल 40 लाख रुपये इतकी आहे.
advertisement
5/7
जर पाकिस्तानने वॉकओवर दिला, तर भारताला सहज 2 पॉइंट्स मिळतील. त्यामुळे भारतासाठी सेमीफायनलची रेस सोपी होईल. मात्र, ब्रॉडकास्टर्सना होणारा आर्थिक फटका भरून काढणं मोठं आव्हान असणार आहे.
advertisement
6/7
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वार्षिक उत्पन्न 3.55 कोटी डॉलर्स आहे, तर या एका मॅचचे मूल्य 25 कोटी डॉलर्सच्या घरात आहे. ही आर्थिक तफावत पाहता, जर आयसीसीने पाकिस्तानवर आर्थिक दंड ठोठावला तर पीसीबीच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते.
advertisement
7/7
दरम्यान, पाकिस्तानने जर अखेरपर्यंत ऐकलं नाही तर पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसेल, अशी शक्यता आहे. आयसीसी देखील पाकिस्तानला मोठा दंड ठोठावू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 22890000000...! भारत पाकिस्तान मॅच रद्द झाली तर कोणाला किती होणार नुकसान? समजून घ्या संपूर्ण गणित