TRENDING:

IND vs NZ : सीरिज जिंकण्यासाठी सूर्याचा डाव, नंबर वन बॉलर बाहेर, ट्रम्प कार्डची टीम इंडियात एन्ट्री!

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आहे. या सामन्यात भारताने टीममध्ये दोन बदल केले आहेत.
advertisement
1/6
सीरिज जिंकण्यासाठी सूर्याचा डाव, नंबर वन बॉलर बाहेर, ट्रम्प कार्डची एन्ट्री!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली तिसरी टी-20 मॅच गुवाहाटीमध्ये होत आहे. पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे.
advertisement
2/6
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले आहेत.
advertisement
3/6
अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्याऐवजी जसप्रीत बुमराह आणि रवी बिष्णोई यांची टीममध्ये निवड झाली आहे. मागच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती.
advertisement
4/6
रवी बिष्णोईचा हा या सीरिजमधला पहिलाच टी-20 सामना आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यामुळे बिष्णोईची टीम इंडियामध्ये शेवटच्या क्षणी निवड झाली आहे. सुंदर टी-20 वर्ल्ड कपपर्यंत फिट झाला नाही, तर बिष्णोईची टीम इंडियामध्ये निवड होऊ शकते, त्यामुळे त्याला मॅच प्रॅक्टिस मिळावी म्हणून संधी देण्यात आली आहे.
advertisement
5/6
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाच्या आता फक्त 3 मॅच शिल्लक आहेत. संजू सॅमसनचा फॉर्म हा वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे, कारण पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये संजू अपयशी ठरला होता.
advertisement
6/6
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : सीरिज जिंकण्यासाठी सूर्याचा डाव, नंबर वन बॉलर बाहेर, ट्रम्प कार्डची टीम इंडियात एन्ट्री!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल