मृत्यूनंतर पुनर्जन्म कसा ठरतो?
कर्माचा हिशोब
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकात नेले जाते. तिथे 'चित्रगुप्त' त्या व्यक्तीच्या आयुष्यभरातील पाप-पुण्याचा हिशोब मांडतात. ज्यांची सत्कर्मे जास्त असतात, त्यांना स्वर्गप्राप्ती किंवा उच्च योनीत जन्म मिळतो, तर वाईट कर्म करणाऱ्यांना नरकवास आणि त्यानंतर नीच योनीत जन्म घ्यावा लागतो.
अंतकाळाचे विचार
मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी माणसाच्या मनात जे विचार असतात, त्यानुसार त्याचा पुढचा जन्म ठरतो. जर मृत्यूसमयी एखादी व्यक्ती परमेश्वराचे नामस्मरण करत असेल, तर तिला मोक्ष मिळतो. परंतु, जर मन माया-ममतेत किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीत/वस्तूत गुंतलेले असेल, तर आत्मा पुन्हा त्याच बंधनात जन्म घेतो.
advertisement
84 लक्ष योनींचे चक्र
शास्त्रानुसार जगात 84 लक्ष योनी आहेत. मानवी जन्म हा या चक्रातील सर्वोच्च मानला जातो. गरुड पुराणात म्हटले आहे की, जर माणसाने या जन्मात विवेकशून्य कृत्य केले, तर त्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळवण्यासाठी हजारो वर्षे पशू, कीटक किंवा वनस्पती म्हणून जन्म घ्यावा लागतो.
पुनर्जन्माचा काळ
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर साधारणपणे 3 ते 40 दिवसांच्या आत त्याचा पुनर्जन्म होतो, अशी मान्यता आहे. या काळात आत्म्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू असतो. कुटुंबाने केलेले 'पिंडदान' आणि 'श्राद्ध विधी' आत्म्याला नवीन शरीर धारण करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात.
अकाल मृत्यू आणि पुनर्जन्म
ज्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून अकाल असतो, अशा आत्म्यांना लगेच नवीन शरीर मिळत नाही. ते आत्मे 'प्रेत योनीत' दीर्घकाळ भटकत राहतात, जोपर्यंत त्यांच्या आयुष्याची ठरलेली वेळ पूर्ण होत नाही.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
