IND vs PAK : हॅन्डशेकवरून पुन्हा मोठा ड्रामा होणार! पाकिस्तानी कॅप्टनचा सूर्याला इशारा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये हॅडशेकवरून वाद झाला होता. पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी हॅडशेक टाळला होता आणि सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हॅडशेक टाळला होता.
advertisement
1/7

श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअमवर उद्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेजल सामना पार पडणार आहे.या सामन्याची जगभरातील क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/7
या सामन्याला जवळपास 24 तासाचा कालावधी उरला असताना पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाने अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. या दरम्यान त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या हॅन्डशेक वादावर देखील प्रतिक्रिया दिली.
advertisement
3/7
दरम्यान आशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये हॅडशेकवरून वाद झाला होता. पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी हॅडशेक टाळला होता आणि सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हॅडशेक टाळला होता.
advertisement
4/7
यावरून आशिया कपमध्ये मोठा वाद पेटला होता.विशेष म्हणजे भारताने आशिया कप जिंकल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेलणे टाळले होते. त्यामुळे देखील मोठा वाद झाला होता.
advertisement
5/7
या वादानंतर आता पुन्हा एकदा भारत पाकिस्ताना आमने सामने येणार आहेत.त्यामुळे त्यांच्यात हॅडशेक होणार का असा सवाल पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाला पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. यावर तो म्हणाला, हॅन्डशेकवर उद्या आपण काय बघू.
advertisement
6/7
एकंदरीत पाकिस्तानने आशिया कपनंतर अशी ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. पण ज्याप्रमाणे दोन्ही संघामध्ये हायव्होल्टेज सामने पार पडतात, ते पाहता या सामन्यातही मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान आता उद्याच्या सामन्यात नेमकं काय घडतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : हॅन्डशेकवरून पुन्हा मोठा ड्रामा होणार! पाकिस्तानी कॅप्टनचा सूर्याला इशारा