IND vs PAK सामन्यात हॅन्डशेक होणार? सूर्या थेट मेसेज दिला पण तुम्हाला कळाला का?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत सूर्याने नो हॅन्डशेक मुद्यावर भाष्य केले आहे.
advertisement
1/7

श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअमवर उद्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेजल सामना पार पडणार आहे.या सामन्याची जगभरातील क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/7
या सामन्याला जवळपास 24 तासाचा कालावधी उरला असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत सूर्याने नो हॅन्डशेक मुद्यावर भाष्य केले आहे.
advertisement
3/7
दरम्यान आशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये हॅडशेकवरून वाद झाला होता. पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी हॅडशेक टाळला होता आणि सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हॅडशेक टाळला होता.
advertisement
4/7
यावरून आशिया कपमध्ये मोठा वाद पेटला होता.विशेष म्हणजे भारताने आशिया कप जिंकल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेलणे टाळले होते. त्यामुळे देखील मोठा वाद झाला होता.
advertisement
5/7
या वादानंतर आता पुन्हा एकदा भारत पाकिस्ताना आमने सामने येणार आहेत.त्यामुळे त्यांच्यात हॅडशेक होणार का असा सवाल पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर तो हॅन्डशेकवर उद्या आपण काय बघू, असे म्हणाला होता.
advertisement
6/7
सलमान आगाला हॅन्डशेकवर विचारल्यानंतर कॅप्टन सूर्याला देखील हाच प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सूर्याने फक्त 24 तास थांबा, टॉसच्या वेळी सांगू, असे तो म्हणाला आहे.
advertisement
7/7
विशेष म्हणजे सूर्याने नो हॅन्डशेकवर थेट भूमिका घेण्याचे टाळल्याचे दिसते आहे, सलमान आगाने देखील तेच केले होते.त्यामुळे कदाचित दोघे हॅन्डशेक करतील असे वाटते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यात हॅन्डशेक होणार? सूर्या थेट मेसेज दिला पण तुम्हाला कळाला का?