IND vs PAK : ईशानने केल्या 77 धावा, पण त्याचीच चूक पडली महागात; टीम इंडियाला का करता आल्या नाहीत 200 धावा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ईशान बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मैदानात होते.पण दोघांना धावा काढण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. त्यात त्यानी पाच ओव्हरमध्ये फक्त 33 धावा काढल्या होत्या.
advertisement
1/7

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान विरूद्ध खेळताना टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली होती. टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माकडून मोठ्या धावांची अपेक्षा होती. मात्र तो शुन्यावर बाद झाला होता.
advertisement
2/7
अभिषेक बाद झाल्यानंतर ईशान किशनने भारताचा डाव सावरला होता. त्याने पॉवरप्लेमध्ये एकट्याने फलंदाजी करून 52 धावा काढल्या होत्या. त्यातल्या 42 धावा एकट्या ईशानच्या होत्या.
advertisement
3/7
दरम्यान पॉवरप्लेनंतरही त्याने वादळी खेळी सूरूच ठेवली होती. त्यानंतर तो 40 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 192 होता.ईशान जेव्हा बाद झाला तेव्हा भारताच्या 8.4 ओव्हरमध्ये 88 धावा झाल्या होत्या. त्यातल्या 77 धावा एकट्या ईशानने केल्या.
advertisement
4/7
ईशान बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मैदानात होते.पण दोघांना धावा काढण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. त्यात त्यानी पाच ओव्हरमध्ये फक्त 33 धावा काढल्या होत्या.
advertisement
5/7
तिलक वर्माला तर खेळायलाच जमत नव्हते. त्यामुळे तो टेस्ट स्टाईलमध्ये फलंदाजी करत होता. त्याने 24 बॉल 25 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी पाहून गंभीर त्याच्यावर मैदानात भडकला देखील होता. त्यानंतर मोठ्या शॉर्ट खेळण्याचा प्रयत्नात तो आऊट झाला होता.
advertisement
6/7
शेवटी रिंकु सिंहने एक षटकार आणि एक चौकार मारला. त्याचसोबत दुबने मारलेला चौकार आणि एक धाव त्याचसोबत एक वाईड असे शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा काढल्या. या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर 176 धावांचे आव्हान आहे.
advertisement
7/7
दरम्यान या सामन्यात ईशान किशनकडूनकडून एक चूक झाली ती म्हणजे या मैदानावर फक्त सेट फलंदाजच खेळू शकतो आणि भारताकडून तो एकमेव खेळाडू होता तो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता. बाकी भारताच्या इतर खेळाडूंना या मैदानावर खेळण्यात प्रचंड अडचण येत होती. त्यामुळे ईशान किशन सेट झाल्यामुळे त्याने मैदानात आणखी ओव्हर टीकून खेळायची गरज होते. कारण तो जिथपर्यंत मैदानात होता तिथपर्यंत भारताचा धावा वेगाने होत होत्या. पण तो बाद होताच धावांचा वेग कमी झाला. हीच मोठी चूक घडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : ईशानने केल्या 77 धावा, पण त्याचीच चूक पडली महागात; टीम इंडियाला का करता आल्या नाहीत 200 धावा