TRENDING:

India vs Pakistan मॅच होणार, पण बोर्डाच्या 'त्या' मागण्यांचा काय? ICCने एका झटक्यात विषय संपवला

Last Updated:
बैठक पाकिस्तानने माघार घ्यावी, यासाठी बोलावण्यात आली होती. पण पाकिस्तानने पुन्हा नवीन नाटक सूरू करत आयसीसीसमोर 4 मागण्या ठेवल्या होत्या. या मागण्यांवर आता आयसीसीने निर्णय घेतला आहे.
advertisement
1/7
India vs Pakistan मॅच होणार, पण बोर्डाच्या 'त्या' मागण्यांचा काय? ICCने एका झटक्
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहा दिवसांनी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. पण पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता? या नकारानंतर रविवारी आयसीसीच्या काही अधिकाऱ्यांची पाकिस्तानी बोर्ड आणि बांगलादेशच्या बोर्डासोबत बैठक झाली होती.
advertisement
2/7
ही बैठक पाकिस्तानने माघार घ्यावी, यासाठी बोलावण्यात आली होती. पण पाकिस्तानने पुन्हा नवीन नाटक सूरू करत आयसीसीसमोर 4 मागण्या ठेवल्या होत्या. या मागण्यांवर आता आयसीसीने निर्णय घेतला आहे.
advertisement
3/7
पाकिस्तान संघाची भारतासोबतची द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करावी. पाकिस्तानने भारत-पाकिस्तान मालिका तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची बाजू मांडली. 2012 पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. अशी पाकिस्तानची पहिली मागणी होती.
advertisement
4/7
तर पाकिस्तानने आयसीसीच्या महसुलातील आपला वाटा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बरोबरीने वाढवावा अशी मागणी केली. वृत्तांनुसार, आयसीसीच्या महसुलातील पीसीबीचा वाटा सध्या अंदाजे 5.75 टक्के आहे. अशी त्यांची दुसरी मागणी होती.
advertisement
5/7
बीसीसीआयने पाकिस्तान संघासोबत हात न मिळवण्याचे धोरण बंद करावे. 2025 च्या आशिया कपपासून भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण पाळत आहे. महिला संघानेही तेच केले होते, ही पाकिस्तानची तिसरी मागणी होती.
advertisement
6/7
आयसीसीने बांगलादेशला 2026 च्या टी20 वर्ल्ड कपमधून वगळून स्कॉटलँडला संधी दिली होती. त्यामुळे बांगलादेशला पूर्ण भरपाई द्यावी अशी मागणी पाकिस्तानच्या बोर्डाने आयसीसीच्या शिष्टमंडळासमोर केली होती. या बैठकीत पाकिस्तानकडून मोहसिन नक्वी, आयसीसीकडून इम्रान ख्वाजा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अमिनुल इस्लाम बुलबुल सहभागी झाले होते.
advertisement
7/7
आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या चार मागण्यापैकी एक मागणी मान्य झाली आहे. तर उर्वरित तीन मागण्या त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असल्याचे सांगून फेटाळून लावण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
India vs Pakistan मॅच होणार, पण बोर्डाच्या 'त्या' मागण्यांचा काय? ICCने एका झटक्यात विषय संपवला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल