Vishal-Akshaya Engagement: हरिद्वारमध्ये साखरपुडा, लवकरच बांधणार साताजन्माची गाठ! कुठे होणार विशाल आणि अक्षयाचं लग्न?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vishal-Akshaya Engagement: कोणत्याही ग्लॅमरस हॉटेलमध्ये नाही, तर हरिद्वारच्या पवित्र भूमीवर विशाल-अक्षयाचा साखरपुडा पार पडला.
advertisement
1/9

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता विशाल निकमने त्याच्या सौंदर्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर एकच धुरळा उडाला. पण हे काही अचानक दिलेलं सरप्राइज नव्हतं, याआधीही बिग बॉस मराठी ३ च्या घरात त्याच्या सौंदर्याबद्दल हिंट दिली होती.
advertisement
2/9
विशाल निकम वारंवार तिचा उल्लेख करायचा, पण ती सौंदर्या नक्की कोण, हे रहस्य त्याने शेवटपर्यंत जपून ठेवलं होतं. मात्र, आता हे रहस्य उलगडलं आणि विशालने थेट तिच्याशी साखरपुडाही केला आहे. विशाल निकमची ही सौंदर्या दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे.
advertisement
3/9
काही दिवसांपूर्वी विशाल आणि अक्षयाने आपल्या नात्याची अधिकृत कबुली देत एक सुंदर व्हिडीओ आणि त्याचे BTS शेअर केले होते. आज त्यांनी साखरपुड्याचे अत्यंत सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही ग्लॅमरस हॉटेलमध्ये नाही, तर हरिद्वारच्या पवित्र भूमीवर या दोघांचा साखरपुडा पार पडला.
advertisement
4/9
पिवळ्या रंगाच्या देखण्या शेरवानीमध्ये विशाल राजबिंडा दिसत होता, तर हिरव्या रंगाच्या भरजरी बनारसी साडीमध्ये अक्षयाचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. त्यांच्या अंगठ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
5/9
हे फोटो शेअर करताना विशाल कमालीचा भावूक झाला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "देव खरोखरच माझ्या बाजूने होता, जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं!" या एका वाक्यात विशालने अक्षयाबद्दलचं आपलं अफाट प्रेम व्यक्त केलं आहे.
advertisement
6/9
विशाल आणि अक्षयाची ओळख 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत विशालने 'युवराज' तर अक्षयाने 'श्रुती'ची भूमिका साकारली होती. पडद्यावरची ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडली आणि आता ही जोडी आयुष्यभरासाठी एक होत आहे.
advertisement
7/9
अक्षयाने तिच्या मेहेंदी सोहळ्याचेही काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून त्यांच्या घरात लग्नाची लगबग सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement
8/9
विशाल निकमने आपल्या लग्नासाठीही एक वेगळी आणि आध्यात्मिक जागा निवडली आहे. या दोघांचं लग्न गंगा घाटावर पारंपरिक पद्धतीने पार पडणार असल्याचं समजतंय.
advertisement
9/9
सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि हजारो चाहत्यांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ज्या सौंदर्यासाठी विशालचे चाहते इतके दिवस उत्सुक होते, ती आता निकम कुटुंबाची सून होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vishal-Akshaya Engagement: हरिद्वारमध्ये साखरपुडा, लवकरच बांधणार साताजन्माची गाठ! कुठे होणार विशाल आणि अक्षयाचं लग्न?